

Australia T20I Team
Sakal
Australia T20 World Cup 2026 Squad: भारत आणि श्रीलंका या देशात ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान पुरुषांचा टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी संघांची घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, ओमान अशा संघांची घोषणा झाली आहे. आता या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियानेही गुरुवारी (१ जानेवारी) त्यांचा प्राथमिक संघ जाहीर केला आहे.