indian compound archers strike gold twice at world cup stage 4  Sakal
क्रीडा

Archery World Cup Stage 4 : भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद

विश्वकरंडक स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात पुरुष, महिलांना सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक (चौथा टप्पा) तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी दुहेरी धमाका केला. पुरुष आणि महिला संघांनी कम्पाऊंडचे सुवर्णपदक जिंकले. चौथे मानांकन असलेल्या ओजस देवताळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत द्वितीय मानांकित अमेरिकेच्या क्रिस शॅफ, जेम्स लुत्झ आणि स्वायर सुलिवान यांचा २३६-२३२ असा पराभव केला;

तर बर्लिन येथे याच महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या आजिती स्वामी, सुरेखा वेन्नम आणि परनीत कौर यांनी आज अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या खेळाडूंचा अवघ्या एका गुणाने पराभव केला.

यंदाच्या वर्षातील या अखेरच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि दोन ब्राँझपदके अशी कामगिरी केली आहे. आता वैयक्तिक गटात ज्योतीकडून आजच्या दिवसातील आणखी एका पदकाची अपेक्षा आहे.

पुरुषांचा संघ अंतिम सामन्यात सुरुवातीला एका गुणाने पाठी होता. अमेरिकेच्या खेळाडूंनी अचूक ६० अशी कामगिरी केली होती. दुसऱ्या राऊंडमध्ये भारतीयांनी सातत्य राखत पुन्हा ५९ अशी कामगिरी केली; मात्र यामध्ये अमेरिकेच्या संघाने दोन गुण गमावले. त्यामुळे ११८-११८ अशी बरोबरी झाली.

तिसऱ्या राऊंडमध्ये भारतीयांनी अचूक ६० चा वेध घेतला आणि तेथेच आपल्यापेक्षा मानांकनात वरचढ असलेल्या अमेरिका संघावर चार गुणांची आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले.

उपांत्य फेरीत संघर्ष

  • भारतीय पुरुषांनी उपांत्य सामन्यात कोरियाचे आव्हान संपुष्टात आणले; परंतु त्यासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागला. २३५ अशी समान गुणसंख्या झाल्यामुळे टायब्रेकर घेण्यात आले. त्यातही दोन्ही संघांनी अचूक ३० अशी कामगिरी केली; परंतु भारतीयांचे बाण लक्ष्याच्या अधिक जवळ असल्यामुळे त्यांना विजयी ठरवण्यात आले.

  • भारतीय महिलांकडे विजेता संघ म्हणून पाहिले जात होते. अंतिम सामन्यात त्यांनी ११८-११७ अशी आघाडी घेतली होती; पण अंतिम टप्प्यात असताना तीन गुण गमावले. मेक्सिकोच्या खेळाडूंनी ५९ अशी कामगिरी करून १७६-१७५ अशी आघाडी घेतली.

  • या आव्हानात्मक स्थितीत भारतीय खेळाडूंनी पाच वेळा १० असा वेध घेत ५९ गुणांची कामगिरी केली. ही अचूकता त्यांना २३४-२३३ अशा फरकाने सुवर्णपदकावर मोहोर उमटवण्यास पुरेशी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT