IND vs SL 3rd ODI Rahul Dravid Health Update  esakal
क्रीडा

Team India : कोच राहुल द्रविड मोठा खुलासा! आशिया कपमधून दोन दिग्गज करणार टीम इंडियात पुनरागमन

सकाळ ऑनलाईन टीम

Asia Cup 2023 Rahul Dravid : वेस्ट इंडीजकडून टी-२० मालिकेत ३-२ असे पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आगामी आशियाई करंडकासाठी टीम इंडियामध्ये के. एल. राहुल व श्रेयस अय्यर या दोन्ही क्रिकेटपटूंचे पुनरागमन होण्याचे संकेत दिले आहेत.

बंगळूरमधील क्रिकेट अकादमीत राहुल व अय्यर या दोघांनी कसून सराव केला. पण दोघेही एकदिवसीय क्रिकेटसाठी तंदुरुस्त आहेत का, हे पडताळले जाणार आहे. त्यानंतरच निवड समितीकडून त्यांना हिरवा कंदील दाखवण्यात येईल. आशियाई करंडक श्रीलंकेत होणार आहे. तिथे कमालीची आद्रर्ता असते.

अशा परिस्थितीत राहुल व अय्यर खेळू शकतील का, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. राहुल द्रविड याप्रसंगी म्हणाले, काही खेळाडू दुखापतीमधून बरे होत भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. अशा खेळाडूंना आशियाई करंडकात आम्ही खेळवणार आहोत.

द्रविड यांनी या वेळी जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल व श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन होईल याबाबत सांगितले. दरम्यान, आशियाई करंडकासाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतही द्रविड यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT