Rohit Sharma
Rohit Sharma 
क्रीडा

INDvsNZ : सामना मी नाही, शमीने जिंकवला : रोहित शर्मा

सुनंदन लेले

वेलिंग्टन : तिसरा टी-20 सामना जिंकून भारतीय संघाने न्यूझीलंड दौर्‍यात टी-20 मालिका जिंकण्याचे स्वप्न साकारले. शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार मारून संघाला विजयी करून देणारा रोहित शर्मा भेटला असता तो पहिले वाक्य काय म्हणाला माहिती आहे? ‘‘सामना मी नाही शमीने जिंकवला’’, हेच रोहितचे पहिले वाक्य होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘मला सांगा की जर शमीने धीर सोडला असता तर सामना जिंकणे अशक्य होते. 20व्या षटकाला सुरुवात होताना काय परिस्थिती हाती बघा. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 95 धावांवर आणि संघातील सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलर विकेटवर उभे होते. शमीचा पहिला चेंडू चुकला. त्याचा फायदा घेत रॉस टेलरने षटकार मारला. न्यूझीलंडला जिंकायला अजून एक मोठा फटका पुरेसा असताना शमीने प्रथम रॉस टेलरला रोखले. मग 95 धावांवर अफलातून फलंदाजी करणार्‍या केन विल्यमसनला बाद केले. इतकेच नाही तर शेवटच्या चेंडूवर सगळे फिल्डर्स एकेरी धाव वाचवण्याच्या स्थितीत उभे असताना रॉस टेलरला बाद केले आणि सामना टाय केला. आता सांगा लढत देण्याची संधी शमीनेच उपलब्ध करून दिली ना’’, असे म्हणत रोहित शर्मानेच प्रश्न केला.

शेवटच्या दोन चेंडूंवर रोहित तू काय कमाल केलीस असे विचारता रोहित चक्कं मराठीत बोलला. ‘‘पहिली गोष्ट म्हणजे सुपर ओव्हरमध्ये दडपण फलंदाजाप्रमाणे गोलंदाजावरही असते. होय माझ्या मनात विचार येत होते की सरकून खेळू का स्थिर उभा राहू. मग मी विचार पक्का केला मी उगाच चेंडू टाकण्याअगोदर हालचाल करणार नाही. चूक त्याला करूदेत. नेमके तसेच झाले त्यानी माझ्या पट्ट्यात चेंडू टाकला आणि मी मग दिली ठेवून.’’

पुढे तो सांगत होता, ‘‘आयपीएल दरम्यान मी सुपर ओव्हरचा थरार अनुभवला असला तरी सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी प्रथमच केली. त्या दिवशी ज्याची लय असते त्याला फलंदाजीला पाठवणे योग्य ठरते. गोलंदाजीच्या बाबतीत सुपर ओव्हर बुमरा टाकणार हे नक्की होते. पहिल्या डावात माझी फलंदाजी बरी झाली म्हणून मला जायची संधी मिळाली. मजा आली. दडपणाखाली कसे शांत राहायचे याचा धडा मिळाला. उगाच काहीतरी वेगळे प्रयत्न करण्याचे टाळून आपल्या बलस्थानांवर विश्वास ठेवला तर चांगले घडू शकते याचा विश्वास बघायला मिळाला.’’

सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली भेटला. तो म्हणाला, की खूप मजा आली आजच्या सामन्यात. आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढून विजय मिळवू शकतो याचा आत्मविश्वास संघाला लाभला आहे. शमीने पहिला चेंडू षटकार मारला जाऊन मन शांत करून पुढचे 5 चेंडू अचूक टाकले. मग रोहितने कमाल टोलेबाजी केली. विजय हा विजय असतो पण असा विजय वेगळीच उभारी देऊन जातो.’’

गुरुवारी दुपारच्या विमानाने भारतीय संघ वेलिंग्टनला येऊन पोहोचला. संघाने अगदी थोडा व्यायाम अंग आखडू नये म्हणून केला पण सराव केला नाही. शुक्रवारी स्काय स्टेडियमवर चौथा टी-20 सामना रंगणार आहे. ज्याच्या सीमारेषा ईडन पार्क सारख्या छोट्या आहेत. 3 पैकी दोन सामन्यात यजमान संघाने भारतीय संघाला टक्कर देणारा खेळ केला आहे. मालिका गमावली असली तरी पराभवांची मालिका खंडीत करायला न्यूझीलंड संघ ताज्या दमाने गुरुवारी मैदानात उतरेल. मालिका जिंकली असल्याने भारतीय संघात काही नव्या खेळाडूंना संधी मिळायची शक्यता कानावर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT