indian cricket team overhaul next 24 and 48 hours big for team india  
क्रीडा

Team India: भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे 24 तास! निवडकर्ते रोहित अन् विराटबाबत घेणार मोठा निर्णय

Kiran Mahanavar

Indian Cricket Team Overhaul : भारतीय क्रिकेटसाठी पुढील २४ ते ४८ तास खुपच महत्त्वाचे असणार आहेत. कारण नव्याने स्थापन झालेली निवड समिती मोठा निर्णय घेणार आहे. प्रथम न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आणि दुसरे म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबाबतचा निर्णय घेणार आहे. 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन बीसीसीआय एक तरुण संघ तयार करू इच्छित आहे. त्याचबरोबर कोहली-रोहितबाबत निवड समिती काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुर्दैवाने न्यूझीलंड मालिकेसाठी कोहली-रोहित निवड किंवा विचार केला जाणार नाही. त्यांना संघातून बाहेर काढले जाणार नाही पण आम्हाला पुढे जाणे आणि भविष्यासाठी संघ तयार करणे आवश्यक आहे. शेवटी निवडकर्त्यांनाच फोन करावा लागेल आणि संबंधितांशी बोलावे लागेल.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेही इनसाइडस्पोर्टला सांगितले की, चेतन आणि त्याची टीम न्यूझीलंड मालिकेसाठी संघ निवडणार आहे. श्रीलंका मालिकेतून वनडे संघात फारसा बदल होणार नाही. पण टी-20 संघासोबत प्रयोग करणे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.

विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय भुवनेश्वर कुमार, आर अश्विन आणि मोहम्मद शमीचा टी-20 संघात समावेश कराचा का नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर लगेचच भारत न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. रोहित, विराट एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे, परंतु 27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेचा भाग असणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

German bakery blast: जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर श्रीरामपूरमध्ये गोळीबार; दुचाकीवरुन दोघे आले अन्...

Latest Marathi News Update : शिर्डी : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त

Temple Tour 2026 : नव्या वर्षाच्या सुरुवातीला घ्या 'या' 5 मंदिरांचे दर्शन; मोठे संकट होणार दूर, मिळेल यश अन् बनेल धनलाभ योग

Pimpri Crime : पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरांकडून १२ घरफोडी उघड; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Railway Recruitment 2026: रेल्वे विभागात नवीन भरती सुरू; अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT