Shubhman Gill esakal
क्रीडा

Shubhman Gill: सारा अन् डेटिंग...शुभमन गिलनं दिली प्रेमाची कबूली

क्रिकटे जगतात शुभमन गिलच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते सर्वांना सर्वश्रुत आहे. सध्या क्रिकटे जगतात शुभमन गिलच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. सारा अनेकदा क्रिकेटर शुभमन गिलसोबत स्पॉट झाली आहे. आता सारासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर शुभमननं मौन सोडलं आहे.(Indian cricketer Shubman Gill Dating Sara Ali Khan )

काही दिवसांपूर्वी, शुभमन गिल आणि सारा एका हॉटेलच्या आवारात दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनेकदा दोघे रेस्टराँमध्ये स्पॉट झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चेनं जोर धरला होता. आता या सर्वांवर स्वतः गिलने भाष्य केलं आहे.

दिली प्रेमाची कबुली?

शुभमन गिलनं प्रीती आणि नीती सिमोज यांच्या 'दिल दिया गल्ला' लोकप्रिय पंजाबी चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला, बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे?; क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले

इतकेच नव्हे तर गिलने प्रेमाची कबूलीदेखील दिली. साराला डेट करतोय का? असाही त्याला सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी तो थोडा लाजला. आणि म्हणाला, सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' गिलच्या या उत्तराने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

साराच्या आधी सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडूलकरसोबत देखील शुभमनचं नाव जोडलं गेलं होतं. तर सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT