IND vs WI: टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच स्टेडियममध्ये राडा! दोन तरुण भिडले, मारहाणीचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

IND VS WI STADIUM FIGHT VIDEO GOES VIRAL: भारत-वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान इंदूरच्या स्टेडियममध्ये दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा २३ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IND VS WI FIGHT VIDEO VIRAL

IND VS WI STADIUM FIGHT VIDEO GOES VIRAL

esakal

Updated on: 

IND VS WI STADIUM FIGHT VIDEO GOES VIRAL: भारत आणि वेस्ट इंडिज ( IND VS WI)यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना रविवारी इंदूर येथे पार पडला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर १४ धावांनी विजय मिळवला. मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात पुनरागमन करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

मात्र, सामन्यानंतर विजयाच्या जल्लोषादरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. स्टेडियममधील प्रेक्षकांच्या गॅलरीत दोन तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीचा २३ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com