indian cwg 2022 medalist meet pm narendra modi harmanpreet kaur sakal
क्रीडा

PM नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर हरमनप्रीत कौर झाली भावूक

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पंतप्रधान मोदींबद्दल दिला भावनिक संदेश

Kiran Mahanavar

Indian CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकू शकला नाही, मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने रौप्यपदक जिंकून देशाला अभिमानाची संधी नक्कीच दिली. रौप्य पदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ मायदेशी परतला आणि शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

पीएम मोदींना भेटल्यानंतर हरमनप्रीत खूप आनंदी दिसली आणि म्हणाली की पीएम मोदी हे प्रेरणास्रोत आहेत जे खेळाडूंचे कठोर परिश्रम आणि यश ओळखतात. PM मोदींनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी नुकत्याच संपन्न झालेल्या 2022 राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी महिला क्रिकेट संघही उपस्थित होता.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या विशेष कार्यक्रमाला प्रशिक्षक आणि खेळाडू तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर हरमनप्रीतने असे काही बोलले जे मोदीजींच्या चाहत्यांना खूप आवडेल. एएनआयशी बोलताना हरमनप्रीत म्हणाला, देशाच्या पंतप्रधानांकडून प्रेरणा घेणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी आमच्याशी बोलतात तेव्हा असे दिसते की संपूर्ण देश आमच्या पाठीशी उभा आहे. प्रत्येकजण आमच्या मेहनतीचे कौतुक करत आहे.

बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ चांगला खेळला, पण हरमनचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालला नाही आणि साखळी सामन्यांनंतर त्यांना अंतिम फेरीत कांगारूंकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी वगळता भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत पाकिस्तान, बार्बाडोस आणि नंतर इंग्लंडला नमवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Crime: वहिनी मध्यरात्री खोलीत शिरली, आतून दरवाजा बंद केला, नंतर झोपलेल्या दिराचे गुप्तांग कापले अन्...; कारण काय?

Police Commemoration Day : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली, उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

SCROLL FOR NEXT