Sunil Chhetri Announced His Retirement sakal
क्रीडा

Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

Sunil Chhetri Announced His Retirement : सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

Kiran Mahanavar

Sunil Chhetri Announced His Retirement: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

जवळपास 10 मिनिटांचा व्हिडिओ शेअर करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छेत्री म्हणाला की, 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्ड कप पात्रता सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. 39 वर्षीय सुनील छेत्रीने भारताकडून खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा महत्त्वाचा भाग होता. त्याने देशासाठी 150 सामन्यात 94 गोल केले. निवृत्तीची घोषणा करताना छेत्रीने आपल्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आणि सांगितले की, मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते.

तो पुढे म्हणाला की, 'मी प्रथम माझ्या आई-वडिलांना आणि पत्नीला या निर्णयाबद्दल सांगितले. माझे वडील खुश झाले पण आई आणि बायको रडायला लागल्या. मी आईला म्हणालो की, तू मला नेहमी म्हणत होता की मला खेळताना पाहून तुला खूप दडपण येतं पण आता तसं होणार नाही. मी भारतासाठी पुन्हा खेळणार नाही मग तू का रडत आहेस.

सुनील छेत्रीने 12 जून 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या शानदार कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. याशिवाय त्यांना 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT