Indian Men's Hockey
Indian Men's Hockey  sakal
क्रीडा

Indian Men's Hockey : भारतीय हॉकी संघाचा पुन्हा पराभव ; ऑस्ट्रेलियाकडून ४-२ने मात,मालिकेत २-०ची आघाडी

सकाळ वृत्तसेवा

पर्थ : भारतीय पुरुष हॉकी संघाला सलग दुसऱ्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या लढतीत ५-१ असा दणदणीत विजय मिळवणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी भारतीय संघावर ४-२ असा विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये बचावात केलेल्या सुमार कामगिरीचा फटका भारतीय हॉकीपटूंना बसला. दोन देशांमधील तिसरा सामना येत्या १० एप्रिलला होणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हायवर्ड (सहावे मिनिट, ३४वे मिनिट), जेकब अँडरसन (४२वे मिनिट) व नॅथन एफरॉम्स (४५वे मिनिट) यांनी शानदार गोल करताना विजयाचा मोलाचा वाटा उचलला. जेरेमी याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. जेकब व नॅथन यांनी फिल्ड गोल केले. भारताकडून जुगराज सिंग (नववे मिनिट) व कर्णधार हरमनप्रीत सिंग (३०वे मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना कडवी झुंज दिली.

पूर्वार्धात २-१ आघाडी

सहाव्या मिनिटाला जेरेमी हायवर्ड याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी बचावात छान कामगिरी केली. नवव्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी दुसरा गोल केला आणि आघाडी मिळवून दिली. हा त्याच्या कारकिर्दीतील १८०वा गोल ठरला. भारतीय संघाकडे पूर्वार्धात २-१ अशी आघाडी होती.

आक्रमणासमोर बचाव निष्प्रभ

यजमान ऑस्ट्रेलियन संघ पूर्वार्धात पिछाडीवर असल्यामुळे तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये त्यांनी आक्रमक भूमिका पत्करली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आक्रमणापुढे भारतीय खेळाडूंचा बचाव निष्प्रभ ठरला. ऑस्ट्रेलियन हॉकीपटूंनी ३४ ते ४५ अशा बारा मिनिटांमध्ये तीन गोल करताना उल्लेखनीय कामगिरी केली. जेरेमी, जेकब व नॅथन यांनी यादरम्यान गोल करीत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्‍चित केला. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी गोल करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली; पण ऑस्ट्रेलियाचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

पॅरिस ऑलिंपिकची तयारी

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका होत आहे. पॅरिस ऑलिंपिकची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे बघण्यात येत आहे. पहिल्या दोन लढतींत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी छान खेळ करताना विजय मिळवले आहेत, मात्र भारतीय खेळाडूंना अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे भारतीयांसाठी पुढील तीन सामने महत्त्वाचे ठरणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT