Badminton sakal
क्रीडा

Thomas Karandak Badminton : भारतीय पुरुष संघाचा थॉमस करंडक बॅडमिंटनमध्ये पराभव

भारतीय पुरुष संघाला थॉमस करंडक या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेमधील 'क' गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

चेंगडू (चीन) - भारतीय पुरुष संघाला थॉमस करंडक या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेमधील 'क' गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाने भारतीय संघावर ४-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे क गटामध्ये इंडोनेशियाने पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.

इंडोनेशिया व भारत या दोन देशांनी क गटामधून बाद फेरीत प्रवेश केला होता. या गटातील थायलंड व इंग्लंड या दोन देशांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे या गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी चुरस होती. इंडोनेशिया - भारत यांच्यामधील लढतीतील विजेता पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणार होता. त्यामुळे या लढतीच्या निकालावर विशेष लक्ष होते.

भारताच्या एच. एस. प्रणोय याने अँथोनी गिनटिंग याचा कडवा संघर्ष १३-२१, २१-१२, २१-१२ असा तीन गेममध्ये मोडून काढला. प्रणोय याने ही लढत एक तास व एक मिनिटात जिंकली व भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंना इंडोनेशियाच्या खेळाडूंचे आव्हान परतवून लावता आले नाही.

सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण मुहम्मद फिकरी - बगार मौलाना या जोडीने सात्विक - चिराग या भारतीय जोडीवर २४-२२, २२-२४, २१-१९ अशी तीन गेममध्ये मात केली. भारतीय जोडीचा एक तास व सतरा मिनिटांमध्ये पराभव झाला.

महत्त्वाच्या लढतीत लक्ष्यची हार

इंडोनेशियाने १-१ अशी बरोबरी केल्यानंतर लक्ष्य सेनवर भारताची मदार होती. परतीच्या एकेरीच्या लढतीत त्याच्याकडून भारताला विजय हवा होता. पण जॉनाथन ख्रिस्तीने लक्ष्यवर २१-१८, १६-२१, २१-१७ अशी मात केली. लक्ष्यला एक तास व पंधरा मिनिटांत हार पत्करावी लागली. इंडोनेशियाने २-१ अशी आघाडी मिळवली. ध्रुव कपिला - साई प्रतीक या जोडीला दुहेरीच्या लढतीत निराशेचा सामना करावा लागला. त्यामुळे इंडोनेशियाला ३-१ अशी विजयी आघाडी घेता आली.

अखेरच्या लढतीत श्रीकांतकडून निराशा

दोन देशांमधील अखेरच्या लढतीत किदांबी श्रीकांतकडून निराशा झाली. पहिला गेम त्याने २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही त्याने चिको वारडोयो या इंडोनेशियाच्या खेळाडूला झुंज दिली. पण दबावाखाली चिको याने आपला खेळ उंचावला व २४-२२ असा हा गेम जिंकत बरोबरी साधली. चिको याने अखेरच्या गेममध्ये यश मिळवत इंडोनेशियाला चौथा विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT