hockey
hockey 
क्रीडा

भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

वृत्तसंस्था

मुंबई - भारताच्या पुरुष; तसेच महिला हॉकी संघाने ऑलिंपिक चाचणी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मनदीपसिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने यजमान जपानला ६-३ असे हरवून अंतिम फेरी गाठली; तर महिला संघाने चीनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत प्राथमिक साखळीत अव्वल क्रमांक मिळवला. महिला संघासमोर निर्णायक लढतीत यजमान जपानचे आव्हान असेल. ही स्पर्धा टोकियोमध्ये सुरू आहे. 

पुरुष संघाने जपानविरुद्धच्या साखळी लढतीचा निकाल विश्रांतीपूर्वीच निश्‍चित केला होता. याच कालावधीत मनदीपने हॅटट्रिक केली आणि भारताने पहिल्या दोन सत्रांतच पाच गोल करीत ५-१ आघाडी घेतली होती. मनदीपला नीलकांता  शर्मा, नीलम संजीव आणि गुरजांत सिंगच्या एका गोलची साथ लाभली होती. आशियाई क्रीडा विजेत्या जपानविरुद्ध भारताने सुरवातीपासून आक्रमक खेळ केला आणि कधीही पकड गमावली नाही. विश्रांतीनंतर जपान जास्त आक्रमक होते; पण भारतीयांनी त्यांना जास्त संधी दिली नाही. 

सविताच्या अप्रतिम गोलरक्षणामुळेच भारतास चीनविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत सोडवता आली. भारताची आक्रमणे वेगवान होती; तर चीनची प्रतिआक्रमणे जास्त योजनाबद्ध होती. चीनने प्रसंगी गोलक्षेत्रात जास्त हुकमतही राखली; पण सविताला चकवणे त्यांना जमले नाही. तिच्या भक्कम बचावाने सहकारी खेळाडूंना प्रेरणा मिळाली. त्यामुळे आक्रमणात संधी साधण्यात अपयश आल्यावरही भारतास हार टाळता आली आणि अंतिम फेरीही निश्‍चित झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT