Indian Men Hockey Team Won Silver Medal In Commonwealth Games 2022 
क्रीडा

CWG 2022 : भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकले रौप्य पदक

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 Men's Hockey : भारतीय पुरूष हॉकी संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून 7 - 0 ने पराभूत झाला. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदकाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून , नॅथन , जेकब अँडरसन आणि यांनी प्रत्येकी 2 गोल केले. तर टॉम विकहम, ब्लॅक गोव्हेर्स, फ्लिन ओगलव्ही यांनी प्रत्येकी 1 गोल केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वर्टरमध्ये 2, दुसऱ्या क्वर्टरमध्ये 3 तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये 1 आणि चौथ्या क्वार्टरमध्ये 1 गोल केला. भारताला ऑस्ट्रेलियाचे आक्रमण मोडून काढत एकही गोल करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल स्पर्धेत सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकले.

सामन्याच्या पहिल्या मिनिटांपासून ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलपोस्टवर आक्रमण करण्यास सुरूवात केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दोन गोल दागले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आपला आक्रमक धडाका कायम ठेवला. यामुळे भारताच्या बचाव फळीवर चांगलाच दबाव आला होता. दरम्यान, गोलकिपर श्रीजेशने आपला अनुभव पणाला लावत अनेक चांगले सेव्ह केले होते. मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने अजून दोन गोल करत सामन्यात 4 - 0 अशी आघाडी घेतली. दुसरे क्वार्टर संपता संपता ऑस्ट्रेलियाने अजून एक गोल करत दुसऱ्या क्वार्टर अखेर 5 - 0 अशी मोठी आघाडी घेतली.

पहिल्या दोन क्वार्टरमध्येच 5 - 0 असा पिछाडीवर पडलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वर्टरमध्ये अजून एक गोल करत आघाडी 6 - 0 अशी केली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकच गोल केला. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने एक गोल करत 7 - 0 अशी आघाडी घेतली. अखेर ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 - 0 असा पराभव करत सातव्यांदा सुवर्ण पदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT