मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  sakal
क्रीडा

Indian Olympic Association : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन

गोव्यात होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीवर भारतीय ऑलिंपिक संघटना समाधानी

सकाळ वृत्तसेवा

पणजी : गोव्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी गोवा सज्ज झाले असून साधन सुविधा आणि इतर तयारीवर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन समाधानी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत स्पष्ट केले. यावेळी ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा, क्रीडामंत्री गोविंद गावडे, असोसिएशनचे सचिव अमिताभ शर्मा, कल्याण चौबे उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले ``राष्ट्रीय स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होतील. स्पर्धेचे उद्घाटन २३,२४ किंवा २५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. याबाबतची अंतिम तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख मिळाल्यानंतर जाहीर केले जाईल. या स्पर्धा प्रथमच गोव्यात होत असल्याने स्पर्धेचे उद्घाटन शानदार पद्धतीने मडगाव येथील फातोर्डा स्टेडियमवर होईल. या स्पर्धेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. यावर ऑलम्पिक संघटना समाधानी आहे.``

राज्यातील खेळाचे वातावरण तयार करण्यासाठी या साधन सुविधांचा उपयोग होईल. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने यापुढे इतर पर्यटनाप्रमाणे ''स्पोर्ट्स टुरिझम'' साठी याचा नक्कीच फायदा होईल. यासाठी गोमंतकियांनी सज्ज व्हावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा म्हणाल्या, गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेची तयारी उत्तम झालेली आहे.

स्पर्धा अत्यंत चांगल्या व खेळाडू वातावरणात नक्कीच यशस्वी होतील. असोसिएशनचे अमिताभ शर्मा म्हणाले गोव्यात फुटबॉल खेळाला विशेष स्थान असले. तरी इतर खेळ प्रकारांमध्येही गोवा पुढे जात आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय स्पर्धेसाठी केलेली तयारी नक्कीच आश्वासक आहे. या तयारीवर असोसिएशन समाधानी आहे. स्पर्धेसाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची स्वतंत्र समिती पाहणी करेल. मात्र आतापर्यंतची तयारी यशस्वी मानावी लागेल.

नेमबाजी, गोल्फ आणि ट्राय सायकलिंग महाराष्ट्रात

३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद गोवा गोव्याकडे असले तरी स्पर्धेतील नेमबाजी, गोल्फ आणि ट्राय सायकलिंग हे तीन क्रीडा प्रकार सुविधांच्या अभावी महाराष्ट्रात होतील. याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT