Abhinav Bindra Sakal
क्रीडा

अभिनव बिंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! भारताच्या सुवर्ण पदक विजेत्याचा Paris Olympic मध्ये होणार मोठा सन्मान

Abhinav Bindra bestowed Olympic Order : भारताचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव ब्रिंदाचा पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून मोठा सन्मान केला जाणार आहे.

Pranali Kodre

Abhinav Bindra bestowed Olympic Order : भारतासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्राचा मोठा सन्मान होणार आहे. येत्या २६ जुलैपासून ११ ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे. या दरम्यान त्याचा 'ऑलिम्पिक ऑर्डर' देऊन गौरव करण्यात येणार आहे.

अभिनव बिंद्राने ऑलिम्पिकसाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून त्याला हा प्रतिष्ठीत सन्मान देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे. त्याला 'ऑलिम्पिक ऑर्डर' हा सन्मान पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या १४२ व्या आयओसी सेशनदरम्यान दिला जाणार आहे.

'ऑलिम्पिक ऑर्डर' हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे. १९७५ सालापासून हा सन्मान देण्यात येतो. त्यापूर्वी ऑलिम्पिक डिप्लोमा ऑफ मीरीट हा सन्मान देण्यात यायचा. भारतीयांमध्ये ऑलिम्पिक ऑर्डर हा पुरस्कार यापूर्वी १९८३ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही देण्यात आला होता.

अभिनवला हा सन्मान दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडाविया यांनी केली.

दरम्यान, अभिनव बिंद्राने २००८ मध्ये बिजिंगला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय अभिनवने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा प्रकारातही पदके जिंकली आहेत.

त्याने २००६ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली होती. हे यश मिळवणाराही तो पहिला भारतीय रायफल शूटर होता. त्याने २०१२ आणि २०१६ ऑलिम्पिकमध्येही सहभाग नोंदवला होता. २०१६ मध्ये तो पदकाच्या जवळ पोहचला. मात्र अखेरच्या क्षणी त्याला चौथ्या क्रमांकावर राहावे लागले.

त्याने नंतर खेळांच्या विकासासाठीही मोठे योगदान दिले. त्यानं अभिनव बिंद्रा फाउंडेशनची स्थापना केली, ज्यातून क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्रित केले जाऊन फिजिकल ट्रेनिंगला प्रोत्साहन दिले जाते.

त्याने ISSF ऍथलीट समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे आणि 2018 मध्ये त्याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समीतीच्या ऍथलीट कमिशनमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. त्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक म्हणूनही निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT