IPL Valuation esakal
क्रीडा

IPL Valuation : बाबो 91,000 कोटी! आयपीएलने पार केला 'श्रीमंती'चा अजून एक बेंचमार्क

अनिरुद्ध संकपाळ

IPL Valuation : डी अँड पी अॅडव्हायजरीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे एकूण मुल्यांकन वाढीचा दर हा 75 टक्के इतका राहिला. 2020 पासून आयपीएलचे एकूण मुल्यांकन हे 10.9 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 91,000 कोटींपर्यंत पोहचले आहे. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. आयपीएल ही बीसीसीआयची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बीसीसीआय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमणावर गुंतवणूक करत असते. त्याचे चांगले रिझल्ट देखील त्यांना मिळातत. आयपीएल ही सध्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. ती आता पैशाच्या बाबतीत फुटबॉल जगतातील मोठमोठ्या लीगला देखील टक्कर देत आहे. सध्या आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात मोठी लीग आहे.

गेल्या वर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघाचा समावेश झाला. त्यांचे मुल्यांकन हे जवळपास 1.6 बिलियन पर्यंत पोहचले. आयपीएलचे 2020 मध्ये मुल्यांकन हे 6.2 बिलियन डॉलर्स इतके होते. आता गेल्या दोन वर्षातील गुंतवणूक आणि नफा पाहता यंदा आयपीएल 10 बिलियन डॉलरचा बेंच मार्क पार केला.

आयपीएलच्या फ्रेंचायजींनी जगभारातील विविध लीगमधील संघाची देखील मालकी मिळवली आहे. ही एक दीर्घकालीन रणनिती आहे. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स यांच्यासह अजून काही फ्रेंचायजींनी विदेशातील लीगमधील संघ विकत घेतले आहेत.

डी अँड पी अडव्हायजरी यांनी आपल्या अहवालात बीसीसीआयला आपले मुल्यांकन वाढवण्यात आयपीएलचे 2023 ते 2027 च्या प्रसारण हक्क लिलावानेही मोठा फायदा झाला आहे. बीसीसीआयने आयपीएल मीडिया राईट्स 6.2 बिलियन डॉलर्सला विकेले. 2017 च्या तुलनेत ही रक्कम तिप्पट होती. याच धरतीवर आता बीसीसीआयने 2023 ची महिला आयपीएलची देखील घोषणा केली आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT