D Gukesh X/FIDE_chess
क्रीडा

Candidates Chess: भारताचा गुकेश विजयाची संधी साधणार? आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

D Gukesh: आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा अंतिम टप्प्यात असून भारताची आशा १७ वर्षांच्या डी गुकेशवर आहे.

सकाळ डिजिटल टीम

टोरंटो येथे होत असलेली आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament) अंतिम टप्प्यात आली आहे. भारताचे आशास्थान असलेला १७ वर्षीय डी. गुकेश उद्याच्या सामन्यातील अडथळा कसा पार करतो यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या सातव्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या फिरोउझा अलिझेराविरुद्ध गुकेशचे पारडे जड असेल, असे सांगण्यात येत आहे.

गुकेशने या स्पर्धेत लक्षवेधक खेळ करत ७.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडी मिळवली. त्याच्यासह हिकारू नाकामुरा आणि रशियाचा इयान नेपोम्नियाची आघाडीवर आहे. त्यामुळे स्पर्धेतील उरलेले दोन सामने या तिघांसाठी मोलाचे आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुकेशसह संयुक्तपणे आघाडीवर असलेल्या नाकामुरा आणि इयान नेपोम्नियाची यांच्यात उद्या सामना होत आहे. नाकामुराचा फॉर्म चांगला आहे. त्याने गेल्या सलग तीन सामन्यांत विजय मिळवलेले आहेत, तर इयान नेपोम्नियाची हा स्पर्धेतला एकमेव खेळाडू अपराजित आहे. गुकेशला अंतिम फेरीत नाकामुराशी सामना करावा लागणार आहे.

गुकेश, इयान नेपोम्नियाची आणि नाकामुरा प्रत्येकी ७.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर असले तरी त्यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पाठी असलेल्या फॅबिआनो कॅरुआना यालाही विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. त्याचा सामना उद्याच्या फेरीत भारताच्या प्रज्ञानंदशी होणार आहे. त्यामुळे ही लढत त्याच्यासाठी सोपी नसेल, असे बुद्धिबळ तज्ज्ञ सांगत आहेत.

प्रज्ञानंदने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती; परंतु नंतर तो सातत्यात कमी पडला. सध्या तो सहाव्या क्रमांवर आहे. शनिवारच्या विश्रांतीमुळे नव्या उमेदीने तो उद्याच्या सामन्यास सामोरे जाईल.

भारताचा आणखी एक खेळाडू विदित गुजराथीनेही स्पर्धेत चमक दाखवली होती. त्याने नाकामुराविरुद्ध विजय मिळवले होते. त्याचा उद्या सामना अबासोवविरुद्ध होणार आहे.

महिलांमध्ये झोंगी टॅन आणि तिंगजीई लेई यांच्यात विजेतेपदासाठी प्रमुख चुरस असेल. दोघींमध्ये अर्ध्या गुणाचे अंतर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT