Manu Bhaker Paris Olympics 2024 sakal
क्रीडा

Manu Bhaker : शाब्बास पोरी! मनु भाकरच्या ऐतिहासिक पदकानंतर आई-वडिलांना आनंद आवरेना, म्हणाले...

Manu Bhaker Latest News Paris Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय ठरली आहे.

Kiran Mahanavar

Manu Bhaker wins 2nd bronze at Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मंगळवारी मनु भाकर आणि सरबज्योत सिंगने (Indian Shooter Sarabjot Singh)10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांचा 16-10 असा पराभव केला.

यासह मनु भाकरने इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. मनुपूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकता आली नव्हती. यादरम्यान मनु भाकरची आई सुमेधा भाकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय नेमबाज मनु भाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याची आई सुमेधा भाकर म्हणाली की, “खूप आनंदी आहे... खरंच मी दोन्ही मुलांसाठी (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग) खुप आनंदी आहे. मी काल तिला फक्त एकच सांगितले की नीट खाऊन लवकर झोप आणि आनंदी रहा, जर काही टेन्शन आले तर सगळ्यात आधी मला फोन करशील. पण आता तिला जसपाल सरांचे मार्गदर्शन लाभल्याने मला खरचं आनंद झाला. मी आज सकाळी पेपरमध्ये गुरू आणि शिष्य यांच्याबद्दल बातम्या वाचू मला खूपच आनंद झाले.

मनुची आई पुढे म्हणाली की, शूटिंग हा फोकसचा खेळ आहे आणि माझ्या एकाग्रतेमुळे मनुलाही फायदा होतो. मी मनुचा सामना टीव्हीवर पाहत नाही. मी सामन्यादरम्यान तपश्चर्या करते. माझा विश्वास आहे की भक्तीमध्ये मग्न राहणे हे मुलीसाठी चांगले आहे.

मनु भाकरने कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिचे वडील राम किशन भाकर म्हणाले की, "ही खूप चांगली बातमी आहे, यासाठी मी देशवासीयांचे खूप प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आणि मनुला मदत केल्याबद्दल धन्यवाद. ...आम्हाला आशा आहे की ती भविष्यात चांगले करेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT