Football Esakal
क्रीडा

Indian Super League football : ISLकरंडकासाठी चढाओढ! बंगळूरसमोर आज ATK मोहन बागानचे आव्हान

आयएसएल स्पर्धेत करंडकासाठी पाचव्यांदा गोव्यात निर्णायक सामना होत

सकाळ वृत्तसेवा

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील करंडक विजेतेपदासाठी शनिवारी (ता. १८) बंगळूर एफसीसमोर कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाचे आव्हान असेल. फातोर्डा येथे हा अंतिम सामना खेळला जाईल.

आयएसएल स्पर्धेत करंडकासाठी पाचव्यांदा गोव्यात निर्णायक सामना होत आहे. बंगळूरने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली असून ते दुसऱ्यांदा करंडक जिंकण्यास प्रयत्नशील असतील. एटीके मोहन बागानने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सायमन प्रेसन यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरने मोसमाच्या सुरुवातीस ड्युरॅड कप पटकावला होता. त्यानंतर आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत खराब सुरुवातीनंतर ओळीने १० सामने जिंकत त्यांनी मुसंडी मारली. स्पर्धेच्या साखळी फेरीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३४ गुण नोंदविले. तिसन्या क्रमांकावरील हुआन फेरोडो

यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानने प्ले ऑफ नॉकआऊट लढतीत ओडिशाला २-० असे हरविले, नंतर उपांत्य फेरीतील दोन्ही टप्प्यांत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर गोलरक्षक विशाल कैथच्या शानदार कामगिरीच्या बळावर हैदराबादला ४-३ असे हरविले.

बंगळूरने प्ले ऑफ नॉकआऊट लढतीत केरळा ब्लास्टर्सला १-० फरकाने नमविले. नंतर लोग शिल्ड विजेत्या मुंबई सिटीला उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात १-० असे नमवून सलग दहावा विजय नोंदविला. परतीच्या लढतीत मुंबई सिटीने २-१ असा विजय मिळविला, त्यामुळे दोन्ही संघांत २-२ अशी गोलबरोबरी झाली. यानंतर पेनल्टी शूटआऊटवर बंगळूर जिंकला.

छेत्री सुपर सब

अनुभवी भारतीय आघाडीपटू ३८ वर्षीय सुनील छेत्री याला बंगळूरचे प्रशिक्षक ग्रेसन यांनी कल्पकपणे वापर केला आहे. गेल्या काही सामन्यांत बदली खेळाडू (सुपर सब या नात्याने छाप पाडताना छेत्रीने तीन वेळा निर्णायक गोल केला. बाद फेरीत केरळाविरुद्ध त्याचा थेट फ्रीकिक गोल निर्णायक ठरला होता.

मैदानात उतरण्यापूर्वी....

बंगळूर एफसीला २०१७-१८ मध्ये उपविजेतेपद, तर

२०१८-१९ मध्ये विजेतेपद

एटीके मोहन बागान २०२०-२१ मध्ये अंतिम

लढतीत पराभूत • बंगळूरचे यंदा स्पर्धेत ३०, तर एटीके मोहन बागानचे २६

गोल • बंगळूरच्या हावी हनडिझचे ७, तर शिवशक्ती नारायणनचे

६ गोल

एटीके मोहन बागानच्या दिमित्रिओस पेट्रोटोसचे १० गोल

१-०, तर कोलकाता येथे

यंदा साखळी फेरीत बंगळूर येथे एटीके मोहन बागान • बंगळूर २-१ फरकाने विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT