Indian Table Tennis mens Team Won Gold Medal In Commonwealth Games 2022  esakal
क्रीडा

भारताचा सुवर्ण पंच! टेबल टेनिसमध्ये पुरूष संघाने जिंकले सुवर्ण

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारतीय टेबलटेनिस पुरूष संघाने सिंगापूरचा 3 - 1 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. या बरोबरच भारताची सुवर्णसंख्या ही 5 पर्यंत पोहचली. टेबल टेनिस पुरूष सांघिक संघाने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकले होते. सिंगापूर विरूद्धच्या सामन्यात पहिल्यांदा भारताने सांघिक प्रकारात सिंगापूरला मात दिली. मात्र एकेरीच्या पहिल्या सामन्यात अचंता पराभूत झाला. त्यानंतर सत्येन गणसेकरन आणि हरमीत देसाईने आपल्या एकेरीचे सामने जिंकत सिंगापूरचे आव्हान मोडीत काढले.

टेबल टेनिस पुरूष सांघिक प्रकारात भारताने पुरूष सुवर्ण पदकाच्या सामन्यात हरमीत देसाई आणि सातिया जी यांनी सिंगापूरच्या योंग क्वेक आणि येव पँगचा 13 - 11, 11 - 7, 11 - 5 असा पराभव करत 1 - 0 अशी आघाडी घेतली. टेबल टेनिस सांघिक अंतिम फेरीत पुरूष एकेरीत भारताच्या अचनता शरथ कमलला पराभवाचा धक्का बसला. सिंगापूरच्या झहे यू चेव्हने त्याचा 7-11, 14-12, 9-11 असा पराभव केला. त्यामुळे सुवर्ण पदकाच्या शर्यतीत भारत आणि सिंगापूर यांची 1 - 1 अशी बरोबरी झाली.

मात्र त्यानंतर सत्यन गणसेकरणने सिंगापूरच्या यू एन कोन पँगचा 12 - 10, 11-7, 11-7, 11-4 असा जिंकत भारताला पुन्हा 2 - 1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हरमीत देसाईने झी यू क्लारेन्स चूचा 8-11, 5-11, 6-11 अशा गेममध्ये एकतर्फी पराभव करत भारताचे नाव सुवर्ण पदकावर कोरले. भारताने सिंगापूरचा 3-1 असा पराभव करत सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : चुटकीवाला भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांची धडक कारवाई

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT