मनिका बत्रा sakal
क्रीडा

Indian table tennis : मनिकाच्या पराभवासह भारतीयांचे आव्हान संपुष्टात

भारतीय टेबल टेनिसपटूंनी निराशाजनक कामगिरी केली. मनिका बत्रा हिला महिला

सकाळ वृत्तसेवा

सिंगापूर : भारतीय टेबल टेनिसपटूंनी निराशाजनक कामगिरी केली.मनिका बत्रा हिला महिला दुहेरी व मिश्र दुहेरी या दोन्ही विभागांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीयांचे सिंगापूर स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

हिना हयाता - तोमोकाझू हरीमोतो या जपानच्या खेळाडूंनी मनिका बत्रा- जी. साथियन या भारतीय जोडीवर ११-९, ११-९, ८-११, ५-११, ११-७ असा विजय साकारला. जागतिक स्पर्धेमध्ये हिना व हरीमोतो या जोडीने रौप्यपदक पटकावले होते, पण चौथ्या मानांकित या जोडीला भारतीय जोडीने कडवी झुंज दिली हे विशेष.

ही लढत ५२ मिनिटे रंगली. दरम्यान, या लढतीआधी मनिका - साथियन या जोडीने झियान झेंग - चेव यू या सिंगापूरच्या जोडीवर ११-७, १२-१०, ९-११, ११-३ असा विजय मिळवत पुढे पाऊल टाकले होते. पहिल्या फेरीत मनिका - साथियन जोडीला पुढे चाल मिळाली होती.

महिला दुहेरीत अपयश

मनिका बत्रा - अर्चना कामत या भारतीय जोडीला महिला दुहेरीत अपयशाचा सामना करावा लागला. मेंग चेन - ईडी वँग या चीनच्या जोडीने मनिका - अर्चना जोडीवर ११-२, ११-६, १३-१५, १०-१२, ११-६ असा विजय नोंदवला. ४२ मिनिटांमध्ये भारतीय जोडीचा पराभव झाला.

एकेरीतही प्लॉप शो

भारतीय खेळाडूंना एकेरी विभागातही यश मिळाले नाही. मनिका बत्रा, जी. साथियन व शरथ कमल या दिग्गज खेळाडूंना एकेरीत सपाटून मार खावा लागला. पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांचे आव्हान सुरुवातीलाच संपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही! सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील १२ शेतकऱ्यांच्या ‘कृषी’कडे तक्रारी; पावसाअभावी ८ तालुक्यांत पेरणी खोळंबली, १५ दिवसांनंतर दुबार पेरणीचे संकट

आजचे राशिभविष्य - 15 जुलै 2026

Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली

Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

Bidkin News : बिडकीनमधून दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता; पोलिसांची रात्रभर शोधमोहीम, नागरिकांना आवाहन

SCROLL FOR NEXT