Paris Olympics Sakal
क्रीडा

Paris Olympics : पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचा टेबल टेनिस संघ जर्मनीत; खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची अधिक संख्या ठरला चर्चेचा विषय

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेची अंतिम तयारी सुरू झाली आहे. भारतीय टेबल टेनिस संघ जर्मनीच्या सारब्रुकेन या शहरात सराव करत आहे; पण खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची असलेली अधिक संख्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांवर आलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेची अंतिम तयारी सुरू झाली आहे. भारतीय टेबल टेनिस संघ जर्मनीच्या सारब्रुकेन या शहरात सराव करत आहे; पण खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची असलेली अधिक संख्या चर्चेचा विषय ठरत आहे.

इटलीचे मॅसिमो कोस्टँटिनी तिसऱ्यांदा भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असणार आहेत आणि त्यांच्या मदतीला भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक सौरव चक्रवर्ती आहेत. इतकेच नव्हे तर चार खेळाडूंसाठी त्यांच्या चार खासगी प्रशिक्षकांना क्रीडा खात्याने मंजुरी दिली आहे. दोन मसाजर आणि एक फिजिओ असा नऊ सदस्यांचा सपोर्ट स्टाफ असणार आहे आणि खेळाडू पुरुष आणि महिला प्रत्येकी तीन असे सहा जण आहेत.

स्टार खेळाडू मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत हे खासगी प्रशिक्षकांसह पॅरिसमध्ये जाणार आहेत. या ऑलिंपिकमध्ये भारताचा ध्वजधारक असणारा अनुभवी खेळाडू शरथ कमाल याच्या साथीला ख्रिस फायफर हे त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक असणार आहेत. हरमी देसाई आणि मानव ठक्कर हे पुरुष संघातील इतर दोन खेळाडू आहेत.

संघात अनेक प्रशिक्षक, मार्गदर्शक असल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कल्पना मांडू शकतात, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो, असे बोलले जात आहे; पण मॅसिमो कोस्टँटिनी हे संघासोबत एक महिन्यापेक्षा अधिक काळ असल्यामुळे आत्तापर्यंत त्यांनी रणनीती तयार केली असेल आणि प्रत्यक्ष स्पर्धेत अडचण येणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे.

वैयक्तिक प्रशिक्षक हे संघाचा तांत्रिक भाग असतील. ते त्यांच्या कल्पना मांडू शकतात. मीसुद्धा माझे मत व्यक्त करणार; पण अंतिम निर्णय माझाच असेल, असे मॅसिमो कोस्टँटिनी यांनी सांगितले. स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी कोर्टवर संघाचे मुख्य प्रशिक्षकच उपस्थित राहू शकतात. वैयक्तिक प्रशिक्षक प्रेक्षक स्टँडमध्येच उपस्थित राहू शकतील. इतकेच नव्हे तर खेळाडू राहत असलेल्या क्रीडाग्राममध्येही त्यांचा निवास नसेल.

२०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी मनिका बत्राने प्रत्यक्ष सामन्याच्यावेळी तत्कालीन राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांची मदत घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिने रॉय यांच्यावर मॅचफिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे टेबल टेनिस संघटनाच बरखास्त करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT