Dilip Vengsarkar sakal
क्रीडा

Dilip Vengsarkar : विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ फेव्हरिट ; दिलीप वेंगसरकर यांचा विश्वास

भारतीय संघाची एकूणच क्षमता पाहता येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आपण फेव्हरिट आहोत, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केला. क्रीडा पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय संघाची एकूणच क्षमता पाहता येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आपण फेव्हरिट आहोत, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केला. क्रीडा पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या वतीने वरिष्ठ क्रीडा पत्रकार- छायाचित्रकारांचा सन्मान आज दिलीप वेंगसकर आणि दिग्गज ॲथलीट एडी सिक्वेरा यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भारताच्या विश्वकरंडक स्पर्धेतील भवितव्याबाबत वेंगसरकर यांनी आशावाद व्यक्त केले. शुभमन गिल, केएल राहुल आणि रिंकू सिंगसारखे खेळाडू अंतिम १५ संघांत स्थान मिळवू शकत नाही, यावरून मुख्य संघाची ताकद दिसून येते, असे वेंगसरकर म्हणाले.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला संघ वेंगसरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीने निवडला होता. त्यावेळी आपण कशी खेळाडूंची निवड केली होती, या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

यंदाच्या स्पर्धेत भारताचे कोणते खेळाडू महत्त्वाचे असतील, या प्रश्नावर बोलताना वेंगसरकर म्हणाले, मुळात ट्वेन्टी-२० हा प्रकार अनिश्चिततेचा आहे. कोणताही खेळाडू कधीही चमकू शकतो; परंतु एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आपल्या सर्व खेळाडूंमध्ये आहे.

प्रत्येक स्पर्धेप्रमाणे या वेळीही भारत-पाक सामन्याची उत्कंठा आहे; परंतु आतापर्यंतचे वर्चस्व आणि भारतीय संघाची ताकद पाहता आपले वर्चस्व अपेक्षित आहे. माझ्यामते उपांत्य फेरीसाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीन संघ निश्चित असतील, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT