Indian team reached in New Zealand 
क्रीडा

INDvsNZ : टीम इंडियाचे टचडाऊन न्यूझीलंड! पाहा फोटो

सुनंदन लेले

ऑकलंड : 19 जानेवारीला निर्णायक एक दिवसीय सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारून मालिका जिंकणार्‍या भारतीय संघाने लगेच दुसर्‍या दिवशी बॅगा भरून न्युझीलंडला प्रयाण केले. संघातील बहुतांशी खेळाडू सिंगापूर एयरलाईन्सच्या विमानाने 21 तारखेला मध्यरात्री ऑकलंडला पोहोचले. विमानतळावरील औपचारिकता पूर्ण करून भारतीय संघातील खेळाडू साधारणपणे पहाटे 1 वाजता बाहेर आले तेव्हा 100 भारतीय चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले.

होय मध्यरात्र उलटून गेल्यावरही भारतीय संघाचे चाहते ऑकलंड विमानतळावर हजर झालेले बघून खेळाडूंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. विराट कोहलीने चाहत्यांना, ‘रात हो गयी...सोये नहीं आप लोग’, असे प्रेमाने विचारले ज्याला चाहत्यांनी, ‘‘न्युझीलंडमें आपका स्वागत करने आये है’’, असे सांगितले.

बुधवारी भारतीय संघातील खेळाडूंनी मैदानावर न जाणे पसंत केले. संध्याकाळी सगळे खेळाडू हॉटेलातील व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करून घाम गाळून आले. यजमान न्युझीलंड संघाने ईडन पार्क बाहेरच्या सराव मैदानावर जोरदार सराव केला ज्याला बहुतांशी खेळाडू हजर झालेले दिसले. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म बघता किती मोठे आव्हान आपल्या समोर आहे याची केन विल्यमसनला कल्पना आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्रीने भारतीय संघ खूपच चांगल्या मनोअवस्थेत असल्याचे सांगितले. ‘‘पहिला सामना मोठ्या फरकाने गमावल्यावर एकाही भारतीय खेळाडूने कच खाल्ली नाही की आत्मविश्वास गमावला नाही. सगळ्यांनी बसून विचार केला आणि बेधडक खेळ करायचा मनोदय पक्का केला. दुसर्‍या सामन्यात विजय मिळवून 1-1 बरोबरी साधल्यावर बेंगलोरला ज्या प्रकारे आपण चांगल्या धावसंख्येचा दमदार फलंदाजी करून पाठलाग केला ते बघता मालिकेतील विजय अजून गोड झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण ताकदीच्या ऑस्ट्रेलियन संघाला आपण हरवले त्याचे समाधान मोठे आहे’’, रवी शास्त्री नेहमीच्या शैलीत सांगून गेला.    

शुक्रवारी पहिला टी20 सामना भारत न्युझीलंड दरम्यान होणार असल्याने भारतीय संघ गुरुवारी ईडन पार्क मैदानावर सरावाला जाणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT