indian umpires nitin menon retains spot icc elite panel SAKAL
क्रीडा

भारतासाठी मोठी बातमी! पंच नितीन मेनन ICC एलिट पॅनलमध्ये कायम

क्रिकेट विश्वातून भारतासाठी एक आनंदाची बातमी

Kiran Mahanavar

क्रिकेट विश्वातून भारतासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारताच्या नितीन मेननला आयसीसी एलिट पॅनलमध्ये कायम ठेवले आहे. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात तो प्रथमच न्यूट्रल पंच म्हणून काम पाहणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीसीने एलिट पॅनेलमधील मेनन यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे.(indian umpires nitin menon retains spot icc elite panel)

इंदूरचे 38 वर्षीय पंच मेनन हे एलिट पॅनेलच्या 11 सदस्यांपैकी एकमेव भारतीय आहेत. आयसीसीने अलीकडेच मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. गेली तीन-चार वर्षे ते आमचे मुख्य पंच आहेत. या महिन्याच्या अखेरीस मेनन न्यूट्रल पंच म्हणून पदार्पण करणार आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात नितीन मेनन यांना एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आले होते. एस वेंकटराघवन आणि एस रवी यांच्यानंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे नितीन मेनन तिसरे भारतीय ठरले आहे. मेननही मात्र भारतातच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम करू शकले, कारण प्रवासी निर्बंधांमुळे आयसीसीने स्थानिक पंचांना घरच्या मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर', महापालिकेचा निर्णय तुघलकी; विरोधकांचा संताप

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

Latest Live Updates Marathi: लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

SCROLL FOR NEXT