Smriti Mandhana Traditional Outfit Photo esakal
क्रीडा

Smriti Mandhana : रखू छुपा के सबसे ओ लैला...'पारंपरिक' स्मृती पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल!

अनिरुद्ध संकपाळ

Smriti Mandhana Traditional Outfit Photo : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला संघाने 23 वर्षानंतर इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकली होती. त्यानंतर महिला संघाने आशिया कप जिंकत आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. आशिया कप फायनलमध्ये भारताची डावखुरी शैलीदार फलंदाज स्मृती मानधनाने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले होते. ही स्मृती मानधना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ती तिच्या शैलीदार खेळीमुळे चर्चेत आलेली नसून ती तिच्या पारंपरिक पोशाखामुळे चर्चेत आली आहे.

स्मृती मानधना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे अनेक मॉर्डन लूकमधील फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. मात्र स्मृतीने नुकतेच आपले पारंपरिक पोशाखातील फोटो इन्स्टाग्रावर शेअर करत एकच खळबळ उडवून दिली आहे. स्मृतीला पारंपरिक पोशाखात पाहून नेटकऱ्यांने कमेंट बॉक्समध्ये कमेंटचा पाऊस पाडला आहे.

एका नेटकऱ्याने तर स्मृतीच्या व्हिडिओवर 'एक तर ह्रदय आहे कितीवेळा जिंकशील' अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर रिप्लाय देखील भरपूर आले आहेत. मात्र त्यातील 'भावा जरा दमानं कोणी ऐकेल मग जिंकणं सोड ह्रदय काढून टाकावं लागेल.' ही कमेंट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

स्मृती मानधनाने कौटुंबीक कार्यक्रमातील आपले पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले. स्मृतीने चमी अँड पलक या डिझायनर ब्रँडचा गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात सुंदर स्मृतीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT