vr vanitha retires from all forms of cricket
vr vanitha retires from all forms of cricket  Sakal
क्रीडा

मनाला पटत नव्हत, पण... या कारणामुळे भारतीय महिला क्रिकेटर थांबली!

सुशांत जाधव

भारतीय महिला क्रिकेटर व्ही आर वनिता (VR Vanitha) हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. 2014 ते 2016 या दोन वर्षांच्या कालावधीत तिने 6 वनडे आणि 16 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 31 वर्षीय महिला क्रिकेटरने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने भारतीय वनडे संघाची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी यांचे विशेष आभार मानले आहेत.

वनिताने जानेवारी 2014 मध्ये श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वनिताने कर्नाटक आणि बंगालचेही प्रतिनिधीत्व केले होते. वनिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "19 वर्षांपूर्वी जेव्हा खेळायला सुरुवात केली त्यावेळी क्रिकेटबद्दल जेवढे प्रेम होते तेवढेच प्रेम आजही आहे. मन थांबण्यापासून रोखत होते पण शरीर साथ देत नाही, यावेळी शरीराचा आवाज ऐकला आणि हा निर्णय घेतला, अशी भावनिक शब्दांत तिने क्रिकेटला अलविदा करत असल्याचे सांगितले.

वनिताने वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रमश: 85 आणि 216 धावा केल्या आहेत. भारतात पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ती भारतीय संघाची सदस्या होती. 2021-22 मध्ये तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालच्या संघाला महिला सीनियर वन-डे ट्रॉफीच्या सेमी फायनलपर्यंत पोहचवले होते. आंध्र प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तिने 61 आणि हैदराबाद विरुद्ध 71 चेंडूत 107 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT