Indian Women Cyclist Allegation On Head Coach esakal
क्रीडा

भारतीय महिला सायकलपटूचा प्रशिक्षकावर गैरवर्तणूक केल्याचा आरोप

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताची अव्वल सायकलपटूने राष्ट्रीय स्प्रींट टीमचे प्रमुख प्रशिक्षक आर. के. शर्मा यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार संघ स्लोव्हेनियामध्ये सराव करत असताना झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला (SAI) या तक्रारीचा मेल पाठवण्यात आला आहे. (Indian Women Cyclist Allegation On Head Coach of Inappropriate Behavior)

साईने (SAI) दिलेल्या वक्तव्यानुसार 'तक्रार करणाऱ्या खेळाडूला त्वरित भारतात आणण्यात येणार आहे. तिच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.' याचबरोबर साई आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी दोन स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केल्या आहेत. दरम्यान, सीएफआयने (Cycling Federation of India) तक्रार करणाऱ्या खेळाडूच्या बाजूने उभे राहणार असल्याचेही सांगितले.

तर साईने स्वतंत्र वक्तव्य प्रसिद्ध केले असून 'सायकलपटूने प्रशिक्षकांविरूद्ध स्लोव्हेनियामध्ये सुरू असलेल्या फॉरेन एक्सपोजर कॅम्पदरम्यान गैरवर्तणूक केल्याची तक्रार आमच्यापर्यंत पोहचली आहे.' असे त्यात म्हटले आहे.

साई आपल्या वक्तव्यात पुढे म्हणते की, 'सायकलपटूकडून तक्रार मिळाल्यानंतर लगेचच तक्रारदाराला त्याच्या सुरक्षेच्या कारणावरून भारतात बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही या विषयाचा तपास करण्यासाठी समिती देखील स्थापन केली आहे.' साईने हे प्रकरण प्राधान्याने हाताळून लवकरात लवकर याच्या निकाल लावणार असल्याचे सांगितले.

तक्रार करणारी सायकलपटू ही भारतीय संघासोबत स्लोव्हेनिया येथे आशियाई चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी गेली आहे. आशियाई चॅम्पियनशिप नवी दिल्लीत 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. प्रशिक्षक आणि इतर भारतीय सायकलपटू 14 जूनला भारतात परतण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT