Indian Women Swimmer Maana Patel Register Best Indian Time In 100 Meter Backstroke  ESAKAL
क्रीडा

Maana Patel | जलतरणपटू माना पटेलने नोंदवली 'सर्वोत्तम वेळ'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पिकपटू माना पटेलने (Maana Patel) महिला 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सर्वोत्तम भारतीय वेळ नोंदवली. फ्रान्समध्ये झालेल्या कॅनेट लेग मारे नॉस्ट्रम जलतरण स्पर्धेत तिने ही कामगिरी केली. गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) खेळणाऱ्या गुजरातच्या (Gujarat) 22 वर्षाच्या मानाने फ्रान्समध्ये 01.03.69 वेळ नोंदवली आहे. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ होती. रविवारी रात्री तिने ही वेळ नोंदवली. विशेष म्हणजे तो स्पर्धेचा शेवटचा दिवस होता.

यापूर्वी भारताकडून महिला 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात यापूर्वी माना पटेलनेच 01.03.77 इतकी वेळ नोंदवली होती. ही वेळ तिने गेल्या वर्षी बेलग्रेडमध्ये नोंदवली. फ्रान्समधील स्पर्धेत माना बी फायनलमध्ये 15 व्या स्थानावर राहिली. जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम हा ज्यावेळी एखादा खेळाडू राष्ट्रीय अॅक्वेटिक चॅम्पियनशिपमधल्या कामगिरीवर ठरवला जातो. तर दुसऱ्या एखाद्या स्पर्धेत जर विक्रमी वेळ नोंदवली गेली तर ती सर्वोकृष्ट भारतीय वेळ म्हणून संबोधली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT