Asian table tennis championship  esakal
क्रीडा

Historic Medal : पोरींनी इतिहास घडवला! आशियाई स्पर्धेत भारतासाठी पक्कं केलं पहिलं पदक

Asian table tennis championship – भारतीय महिला टेबल टेनिस संघाने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले पदक निश्चित केले.

Swadesh Ghanekar

Indian women's team scripted history – भारतीय महिला टेबल टेनिस संघाने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. कझाकस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाने रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय महिला संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाला ३-२ अशी मात दिली. उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताने या स्पर्धेतील पदक पक्के केले आणि हे या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे पहिले पदक ठरले आहे.

अहिका मुखर्जी या सामन्यातील स्टार ठरली. तिने पहिला व शेवटचा सामना जिंकून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अनुभवी मनिका बात्राने दुसरा सामना जिंकताना भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु चौथ्या सामन्यात हार झाल्याने मॅच २-२ अशी बरोबरीत आली. अहिकाने पाचवा व निर्णायक सामना जिंकून भारताचे या स्पर्धेतील पहिले पदक निश्चित केले.

अहिकाने पहिल्या सामन्यात कोरियाच्या युबिन शिनचा ३-२ असा पराभव केला. अहिकाने पहिला सेट घेतल्यानंतर युबिनने कमबॅक केले आणि सामना २-२ असा बरोबरीत आला होता. पण, पाचव्या सेटमध्ये अहिकाने ११-७ अशा विजयासह भारताला आघाडी मिळवून दिली. मनिकाने दुसऱ्या सामन्यात १२-१४, १३-११, ११-५, ५-११, १२-१० अशा अटीतटीच्या लढतीत झिई जिऑनला ५० मिनिटांत हार मानण्यास भाग पाडले. पण, श्रीजा अकुला व मनिका बात्रा यांना पराभव पत्करावा लागल्याने सामना २-२ असा बरोबरीत आला. अहिकासमोर जिऑनचे आव्हान होते आणि तिला पहिला सेट गमवावा लागला. त्यानंतर अहिकाने जोरदार पुनरागमन केले आणि ४० मिनिटांत बाजी मारून भारताचे ऐतिहासिक पदक पक्के केले.

संक्षिप्त निकाल

भारत वि. वि. दक्षिण कोरिया ३-२

  • अहिका मुखर्जी वि. वि. युबिन शिन ११-९, ७-११, १२-१०, ७-११, ११-७

  • मनिका बात्रा वि. वि. झिई जिऑन १२-१४, १३-११, ११-५, ५-११, १२-१०

  • श्रीजा अकुला पराभूत वि. इयून्ही ली ६-११, १०-१२, ८-११

  • मनिका बात्रा पराभूत वि. युबिन शिन ११-१३, ४-११, ११-६, ११-७, १०-१२  

  • अहिका मुखर्जी वि. वि. झिई जिऑन ७-११, ११-६, १२-१०, १२-१०  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Latest News : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीवर शरद पवारांचे भाष्य, पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार पवार काय म्हणाले?

Raghav Chadha Voter List : राघव चड्ढांना मोठा धक्का! ड्राफ्ट मतदार यादीतून नाव गायब; म्हणाले- ही क्लार्कची चूक नाही तर...

विद्यानंद बापटांपूर्वी नारायण पेठेतील ‘PIL मॅन’ DJ विरोधात लढला होता! सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला लढा

Marathi News Live Updates : प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

पाकडे जगासमोर उघडे! Imam-Ul-Haq वर दोन वर्षांच्या बंदीची तलवार, तर मोहम्मद रिझवानची कारकीर्द संकटात; नेमका काय केलाय कांड?

SCROLL FOR NEXT