Indian women's hockey 
क्रीडा

Indian women's hockey : महिला हॉकी संघाने जिंकले कांस्यपदक

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकले

Kiran Mahanavar

Indian women's hockey : भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. नियमित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. यानंतर भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.

भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. आज स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कांस्य पदकासाठी लढत पार पडली. शूट-आऊट सामन्यात भारताची गोलरक्षक सविताने तीन गोल वाचवले आणि तब्बल १६ वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक मिळवून दिले.

भारतीय महिला हॉकी संघ आणि न्यूझीलंड महिला हॉकी संघात आज कांस्यपदाकासाठी सामना रंगला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं चेंडू स्वत:जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, तरीही दोन्ही संघाला गोल करता आला नाही.

दुसऱ्या क्वार्टरच्या 14 व्या मिनिटाला भारतानं पहिला गोल केला. सलीमा टेटेनं गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वॉर्टरच्या शेवटच्या क्षणी न्यूझीलंडच्या संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यात फायदा घेत न्यूझीलंडनं करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला.

भारत आणि न्यूझीलंडचा संघ याआधी 34 वेळा आमनेसामने आला होता, ज्यामधील 23 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता तर भारताने 10 सामने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT