Anshu-Malik 
क्रीडा

कुस्तीपटू अंशू मलिकने रचला इतिहास; भारताला मिळालं रौप्यपदक

विराज भागवत

अमेरिकेच्या हेलन मारोलिसशी रंगला होता सामना

ओस्लो (नॉर्वे): येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची कन्या अंशू मलिक हिने इतिहास रचला. Wrestling World Championships मध्ये अंशू मलिकने रौप्यपदकाची कमाई केली. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणारी अंशू पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली. युरोपच्या सोलोमिया विनिकला पराभूत करून अंशूने स्पर्धेच्या फायनल्समध्ये प्रवेश केला होता. आजच्या सामन्यात अंशूने अमेरिकेच्या हेलन मारोलिसशी दोन हात केले. पण तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हेलन मारोलिसने ५७ किलो वजनी गटात विश्वविजेतेपद पटकावले.

त्यासोबतच, ५९ किलो वजनी गटात भारताच्या सरिता मोर हिनेही कांस्यपदकाची कमाई केली. सरिताला सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली होती. त्यामुळे तिने आज कांस्यपदकाच्या लढतीत सहभाग घेत सामना जिंकला. तिने स्वीडनच्या कुस्तीपटूला ८-२ असे पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT