Indian Wrestlers Protest sakal
क्रीडा

Indian Wrestlers Protest : भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक बेकायदा ; खेळाडूंचा आरोप

मागील वर्षी घेण्यात आलेली भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक ही बेकायशीर असल्याचा आरोप भारतातील कुस्तीपटूंनी केला असून या प्रकरणात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मागील वर्षी घेण्यात आलेली भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक ही बेकायशीर असल्याचा आरोप भारतातील कुस्तीपटूंनी केला असून या प्रकरणात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय कुस्ती संघटनेला कुस्तीपटूंच्या आरोपांना उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी येत्या ७ मार्चला होणार आहे.

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट व सत्यवर्त कडियन या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक बेकायदा असल्याचा आरोप करीत नवी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायाधीश सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, भारतीय कुस्ती संघटना व ॲड हॉक समिती यांना याचिकेवर नोटीस पाठवली आहे.

व्यावसायिक कुस्तीपासून दूरच-साक्षी मलिक

ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत भारताचे नाव उज्ज्वल करणारी साक्षी मलिक हिने कुस्ती क्षेत्राला अलविदा केला. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात काही कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलनही करण्यात आले. मात्र, ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. साक्षी मलिक हिने या सर्व प्रकरणाला कंटाळून कुस्तीला रामराम केला. कुस्तीमध्ये पुनरागमन करण्यासाठी तिला चोहोबाजूंनी विचारणा करण्यात येत आहे. मात्र, तिने व्यावसायिक कुस्तीपासून दूरच राहणार असे स्पष्ट केले.

कुस्तीपटूंचे महत्त्वाचे मुद्दे

  • क्रीडा संहितेचे उल्लंघन करून भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक घेण्यात आली.

  • आशियाई अजिंक्यपद, आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीचे आयोजन बेकायदा आयोजन करण्यात आले.

  • आमच्यासह आणखी कुस्तीपटूंचाही मानसिक व लैंगिक छळ करण्यात आला.

  • ॲड हॉकी समितीनेच भारतीय कुस्ती संघटनेचा कारभार सांभाळावा.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडे संघटनेची जबाबदारी सोपवल्यासही आनंद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT