Manu Bhaker sakal
क्रीडा

Manu Bhaker : ‘पिस्तूल क्वीन’;ऑलिंपिकमध्ये मनू भाकरला ब्राँझ

भारताची २२ वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर हिने रविवारी फ्रान्समधील शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधून ऐतिहासिक यश संपादन केले.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : भारताची २२ वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर हिने रविवारी फ्रान्समधील शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधून ऐतिहासिक यश संपादन केले. ‘पिस्तूल क्वीन’ मनू हिने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकावर मोहर उमटवत भारताचे पॅरिस ऑलिंपिकमधील पदकाचे खाते रुबाबात उघडले. ऑलिंपिकच्या इतिहासात नेमबाजी या खेळामध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. लंडन ऑलिंपिकनंतर भारताने नेमबाजी या खेळामध्ये पदक जिंकले. भारताने १२ वर्षांनंतर नेमबाजीमध्ये पदकावर निशाणा साधला.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, विश्‍वकरंडक, आशियाई स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या मनू भाकर हिला यापूर्वी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते. २०२१ मधील ऑलिंपिक सुरू होण्याआधी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने न खेळण्याचा निर्णय घेतला.

पदकापर्यंतचा प्रवास

पदकासाठीच्या शर्यतीत मनू भाकरच्या देहबोलीतून आत्मविश्‍वासाची झलक पहायला मिळत होती. अगदी पहिल्या शॉटपासून ती पदक जिंकण्याच्या शर्यतीत होती. जिन ओह व येजी किम या कोरियाच्या दोन नेमबाजांसह मनू सातत्यपूर्ण कामगिरी करीत होती. २० व्या शॉटनंतर व्हिएतनामची विन त्रिन ही बाहेर गेली. तिला १९८.६ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यानंतर मनूचे पदक निश्‍चित झाले, पण पदकाचा रंग कोणता हे २२ व्या शॉटनंतर समजले. मनू हिने २२ व्या शॉटमध्ये १०.३ गुण कमावले.

कोरियाच्या येजी किम हिने या वेळी दबावाखाली अचूक निशाणा लावला. तिने चक्क १०.५ गुणांना टार्गेट केले. यामुळे मनू हिला २२१.७ गुणांसह ब्राँझपदक मिळाले. किम हिने याप्रसंगी २२१.८ गुणांसह आगेकूच केली. फरक होता फक्त ०.१ गुणाचा. यानंतर सुवर्ण व रौप्यसाठी दोन कोरियन खेळाडूंमध्ये लढत पार पडली. जिन ओह हिने २४३.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर किम हिने २४१.३ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली.

हे पदक ऐतिहासिक आहे. नेमबाजीत पदक मिळवणारी पहिली महिला ठरल्याने मनू भाकरचे यश विशेष आहे. अतुलनीय यश !

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT