भारतीय कुमार सायकलपटू जगात सर्वोत्तम ठरले आहेत 
क्रीडा

कुमार सायकलीस्ट जगात सर्वोत्तम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारताच्या कुमार सायकलपटूंनी जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. भारतीय कुमार संघाने स्प्रिंट प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याचा पराक्रम केला. रोनाल्डो लैतोनजाम याने तीन वैयक्तिक प्रकारांत अव्वल क्रमांक मिळवत भारताच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.

रोनाल्डो केईरीन, स्प्रिंट तसेच एक कि.मी. टाईम ट्रायल प्रकारात अव्वल आहे. सलग तिसऱ्या वर्षी भारतीय स्पर्धकाने हा मान मिळवला. एसॉ याने दोन वर्षांपूर्वी हा मान मिळवला होता. त्यानंतर गतवर्षी रोनाल्डोने एसॉला मागे टाकत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. रोनाल्डोने आता ते राखले आहे, त्याच वेळी रोजित सिंग याने केईरीन आणि स्प्रिंट या प्रकारात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

कुमारी प्रकारातील स्प्रिंटच्या क्रमवारीत भारतीय संघ दुसरा आहे. टाईम ट्रायल प्रकारात त्रिशा पॉल तिसरी आहे; तर निकिता केईरीन प्रकारात दुसरी आहे. गेल्या काही वर्षांत आशियाई तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सायकल स्पर्धकांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.

सर्वोत्तम भारतीय
- केईरीन कुमार, वैयक्तिक ः 1) रोनाल्डो लैतोनजाम, 2) रोजित सिंग. सांघिक ः 1) भारत, 2) दक्षिण आफ्रिका.
- स्प्रिंट कुमार, वैयक्तिक ः 1) रोनाल्डो लैतोनजाम, 3) रोजित सिंग. सांघिक ः 1) भारत, 2) ब्रिटन.
- एक कि.मी. टाईम ट्रायल कुमार, वैयक्तिक ः 1) रोनाल्डो लैतोनजाम. सांघिक ः 1) बेल्जीयम, 2) भारत.
- स्प्रिंट सांघिक कुमार- 1) भारत (1620), 2) जर्मनी (1162.5).

तीन वर्षे आपण कुमार गटात अव्वल आहोत. अर्थातच ही नक्कीच प्रगती आहे. चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने चांगली तयारी सुरू आहे हेच यातून दिसते.
- आर. के. शर्मा, भारताचे मार्गदर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : मुंबईतील 'फिल्म सिटी'मधील प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT