Norway Chess Tournament  sakal
क्रीडा

Norway Chess Tournament : आर. प्रज्ञानंदची शानदार सुरुवात तर ; कार्ससनचा विश्वविजेत्यावर विजय

येथे आजपासून सुरू झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर. प्रज्ञानंदने धडाकेबाज सुरुवात करून फ्रान्सच्या फिरोज्जा अलीरेझाचा सहज पराभव केला. निर्धारित वेळेतील लढत अनिर्णित राखल्यानंतर प्रज्ञानंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना १० मिनिटे मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

स्टॅव्हेंजर (नॉर्वे) : येथे आजपासून सुरू झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर. प्रज्ञानंदने धडाकेबाज सुरुवात करून फ्रान्सच्या फिरोज्जा अलीरेझाचा सहज पराभव केला. निर्धारित वेळेतील लढत अनिर्णित राखल्यानंतर प्रज्ञानंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना १० मिनिटे मिळाली. तर फिरोज्जा अलीरेझाकडे केवळ सातच मिनिटे होते. प्रज्ञानंदने या संधीचा फायदा घेत शानदार विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस क्लार्सनने विश्वविजेत्या चीनच्या डिन लिरेनविरुद्धचा पहिला डाव १४ चालींतच अनिर्णित राखला; पण पुढच्या ६८ चालींच्या मॅरेथॉन डावात त्याचा पराभव केला. तर हिकारू नाकामुरा याने फॅबियानो काऊआनाविरुद्ध आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिल्या फेरीनंतर प्रज्ञानंद, कार्लसन आणि नाकामुरा प्रत्येकी १.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. महिलांमध्ये प्रज्ञानंदची बहिण आर. वैशालीचा युक्रेनच्या ॲना मुझीचूकविरुद्ध पराभव झाला. या पहिल्या डावात वैशाली काळ्या मोहऱ्यांसह खेळत होती.

पहिल्या फेरीचे निकाल

आर प्रज्ञानंद (भारत, १.५) वि.वि. फिरोज्जा अलीरेझा (फ्रान्स १.५-१); डिंग लिरेन (चीन १) पराभूत वि. मॅग्नस कार्ससन १.५); फॅबियानो कारुआना (अमेरिका १) पराभूत वि. हिकारू नाकामुरा (अमेरिका १.५)

महिला : पिया क्रॅमलिंग (स्वीत्झर्लंड १) पराभूत वि. कोनेरू हम्पी भारत १.५); वेनजुन जू (चीन १.५) वि.वि. आर वैशाली (भारत १.५-१); ॲना मुझीचूक (युक्रेन १) पराभूत वि. टिंगजी लेई (चीन, १.५-१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT