Suryakumar Yadav File Photo
क्रीडा

ENG vs IND : ठरलं ! मुंबईकर निघाले इंग्लंडला

बीसीसीआयने अधिकृतरित्या या दोघांना इंग्लंडला पाठवणार असल्याची माहिती दिलीये.

सुशांत जाधव

England vs India Test Series : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील तीन खेळाडूंनी दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला हे दोन्ही खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर आहेत. बीसीसीआयने अधिकृतरित्या या दोघांना इंग्लंडला पाठवणार असल्याची माहिती दिलीये.(Indias Tour of England 2021 Prithvi Shaw and Suryakumar Yadav as replacements)

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिल, वाशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यांनी इंग्लंड दौऱ्यावरुन माघार घेतल्यानंतर टीम व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे पर्यायी खेळाडूंची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यांचा भारतीय कसोटी संघात समावेश केलाय. (Indias Tour of England 2021 Prithvi Shaw and Suryakumar Yadav as replacements of Injured Players)

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी यष्टीरक्षक रिषभ पंतचा कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आला होता. तो यातून सावरुन संघाच्या ताफ्यात सामीलही झालाय. भारतीय संघाचे बॉलिंग कोच बी अरुण, वृद्धीमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी देखील लंडनमध्ये क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण केली असून ते तिघे डेरहममध्ये असलेल्या टीम इंडियाला जॉईन झाल्याची माहिती बीसीसीआने निवेदनाच्या माध्यमातून दिलीये.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी असा भारतीय संघ

रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT