क्रीडा

भारताचा कंबोडियावर निसटता विजय

पीटीआय

न्हॉम पेन्ह (कंबोडिया) -भारताने मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात कंबोडियावर ३-२ अशी मात केली. दुसऱ्या सत्रातील धडाक्‍याच्या जोरावर भारताने निसटता विजय मिळविला.

ऑलिंपिक स्टेडियमवरील कृत्रिम हिरवळीवर हा सामना झाला. सुनील छेत्रीने ३६व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले, पण पुढच्याच मिनिटाला कोहून लॅबोरावी याने कंबोडियाला बरोबरी साधून दिली. ही बरोबरी मध्यंतरापर्यंत कायम राहिली. त्यानंतर उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या जेजे लालपेखलुआ आणि संदेश झिंगन यांनी प्रभाव पाडला. या दोघांनी चार मिनिटांच्या अंतराने गोल केले. जेजे याने ५०व्या मिनिटाला लक्ष्य साधले, तर संदेश झिंगन याने ५४व्या मिनिटाला हा गोल केला. जॅकीचंद सिंग याने जेजे याला पास दिला. त्यामुळे जेजे गेल्या आठ सामन्यांत भारतासाठी आठवा गोल करू शकला. त्याआधी युजीन्सन लिंगडोह याने कॉर्नरवर दिलेल्या चेंडूला बचाव फळीतील झिंगनने अचूक हेडिंग केले.

कंबोडियाकडून ६२व्या मिनिटाला चॅन वथानाका याने दुसरा गोल केला. त्याने गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. त्यानंतर मात्र भारताने बचाव अभेद्य राखला.

दृष्टिक्षेपात
 भारताला परदेशातील मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात १२ वर्षांच्या खंडानंतर प्रथमच विजय
 यापूर्वी २००५ मध्ये पाकिस्तानवर मात
 भारताकडून अनास एडाथोडीका आणि मिलन सिंग यांचे 
    आंतरराष्ट्रीय पदार्पण, अनास ५१२वा, तर मिलन ५१३वा खेळाडू
 भारताची यानंतर आशियाई करंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत २८ मार्च रोजी म्यानमारविरुद्ध लढत
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामना खेळताना भारतीय संघाने वेगवान प्रारंभ करण्याची गरज आहे.आपल्या खेळाडूंनी एकमेकांच्या साथीत खेळायला शिकावे. परदेशात सामना जिंकला असला तरी फार हुरळून जाण्याची गरज नाही.
- स्टीफन कॉन्स्टंटाईन, भारताचे प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT