indonesia open badminton 
क्रीडा

Indonesia Open: श्रीकांत-लक्ष्यचा पराभव, समीर-प्रणॉयने दुसरी फेरीत

किदांबी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत फ्रेंच खेळाडू ब्रिस लेव्हर्डेझकडून पराभव पत्करावा लागला.

Kiran Mahanavar

Indonesia Open Badminton: भारताच्या एच. एस. प्रणॉयने लक्ष्य सेनचा पहिल्या फेरीच्या सामन्यात सरळ गेममध्ये पराभव करत बुधवारी येथील ‘इस्टोरान सेनायन’ येथे इंडोनेशिया ओपन ‘सुपर १०००’ स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांच्या पुरुष दुहेरी जोडीनेही दुसऱ्या फेरीत प्रगती केली. तर, किदांबी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत फ्रेंच खेळाडू ब्रिस लेव्हर्डेझकडून पराभव पत्करावा लागला.

वर्षाच्या सुरुवातीला लक्ष्यने ‘हेड-टू-हेड’ दोन सामन्यांत २-० अशी बाजी मारली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय सर्कीटवर प्रणॉयने एकतर्फी विजय मिळवला. ३४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने लक्ष्यला २१-१०, २१-९ असे पराभूत केले. प्रणॉयची पुढची लढत एनजी का लाँग एंगसशी होईल, तर ध्रुव-अर्जुनची लढत चीनच्या लियू यू चेन आणि औ झुआन यी यांच्याशी होईल, ज्यांनी पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित अहसान-सेटियावानला पराभूत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT