indonesia open hs prannoy satwik chirag advance to semifinals kidambi srikanth bows out sakal
क्रीडा

Indonesia Open : एचएस प्रणॉय जिंकला, किदांबी श्रीकांत हरला

दुहेरीत सात्विक-चिरागची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा

जकार्ता : भारतासाठी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनमधील शुक्रवारचा दिवस संमिश्र ठरला. एकीकडे किदांबी श्रीकांतची झुंज अपयशी ठरली, तर दुसरीकडे एच. एस. प्रणॉयने प्रतिस्पर्ध्याला हरवत पुरुषांच्या एकेरीत पुढे पाऊल टाकले. सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने पुरुषांच्या दुहेरीत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

किदांबी श्रीकांतसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली शी फेंग याचे आव्हान होते. फेंग याने पहिला गेम २१-१४ असा जिंकत आघाडी घेतली. श्रीकांतने मात्र दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन केले. त्याने हा गेम २१-१४ असा जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये श्रीकांतला चांगला खेळ करता आला नाही. फेंग याने हा गेम २१-१२ असा जिंकत सामना आपल्या नावावर केला. श्रीकांतने ही लढत एक तास व ९ मिनिटांत गमावली.

सातव्या मानांकित एच. एस. प्रणॉयने तिसरा मानांकित कोडाय नाराओका याच्यावर शानदार विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. प्रणॉयने २१-१८, २१-१६ असे यश संपादन केले. प्रणॉयने ही लढत ५५ मिनिटांमध्ये खिशात टाकली.

दुहेरीत पाऊल पुढे

सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने गेल्या काही काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्येही या जोडीकडून छान कामगिरी होत आहे. सात्विक-चिराग या जोडीने फझर अल्फियन - मोहम्मद अरदियांतो या जोडीवर २१-१३, २१-१३ असा विजय साकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT