Indonesia Open  sakal
क्रीडा

Indonesia Open : पी. व्ही. सिंधूचा सलामीलाच पराभव ; इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत निराशा

भारताची अनुभवी खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्याच लढतीत निराशेचा सामना करावा लागला. चीन तैपईच्या वेन ची. सू. हिने सिंधूचा कडवा संघर्ष तीन गेममध्ये मोडून काढला आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

जकार्ता : भारताची अनुभवी खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्याच लढतीत निराशेचा सामना करावा लागला. चीन तैपईच्या वेन ची. सू. हिने सिंधूचा कडवा संघर्ष तीन गेममध्ये मोडून काढला आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला.

वेन ची. सू. हिने पहिला गेम २१-१५ असा आपल्या नावावर केला, मात्र अनुभवी खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन केले. तिने हा गेम २१-१५ असा जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. चीन तैपईच्या खेळाडूने तिसऱ्या गेममध्ये सर्वोत्तम खेळ केला. तिने या गेममध्ये २१-१४ असे यश मिळवत लढतही जिंकली. सिंधू हिचा एक तास व दहा मिनिटांत पराभव झाला.

तनीषा-अश्‍विनीचा विजय

भारताला दुहेरी विभागात संमिश्र यश मिळाले. एकीकडे तनीषा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा यांनी महिला दुहेरीत विजय साकारला, तर दुसरीकडे ॠतपर्ण पंडा व श्‍वेतपर्ण पंडा या जोडीला हार सहन करावी लागली. तनीषा-अश्‍विनी जोडीने जॅकी डेंट-क्रिस्टल लेई या जोडीचे आव्हान २१-१५, २१-१५ असे ३४ मिनिटांत संपुष्टात आणले. किम यिआँग - काँग याँग या जोडीने ॠतपर्ण-श्‍वेतपर्ण जोडीवर २१-१२, २१-९ अशी मात केली. भारतीय जोडीचा ३६ मिनिटांत पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT