Indonesia Open  sakal
क्रीडा

Indonesia Open : सात्विक-चिराग जोडी जेतेपद राखणार?

सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरीतील जोडीवर उद्यापासून सुरू होत असलेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची मदार असणार आहे. सात्विक-चिराग जोडीला जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

जकार्ता : सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरीतील जोडीवर उद्यापासून सुरू होत असलेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची मदार असणार आहे. सात्विक-चिराग जोडीला जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. पॅरिस ऑलिंपिकदृष्टीने ही स्पर्धा सात्विक-चिराग जोडीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने यंदाच्या मोसमात चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी दोन स्पर्धा जिंकण्यात या जोडीला यश लाभले आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी हीच जोडी प्रबळ दावेदार समजली जात आहे.

त्याआधी इंडोनेशिया स्पर्धेत दमदार कामगिरी करीत या जोडीला आत्मविश्‍वास कमवावा लागणार आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा कस लागणार आहे. तसेच पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणोय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत या खेळाडूंकडे ऑलिंपिकची तयारी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच तनीषा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा, ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोड्यांवर महिला दुहेरीची मदार अवलंबून असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT