INDvsENG 
क्रीडा

INDvsENG : 25 धावांसह डावानं जिंकत टीम इंडियानं गाठली फायनल

सकाळ ऑनलाईन टीम

भारतीय संघाने चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 25 धावा आणि एक डाव राखून जिंकला आहे. तिसऱ्या दिवशीच सामना संपवत टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या डावात 205 धावांत आटोपलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 135 धावांत आटोपला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.

पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरने अक्षर पटेलच्या साथीनं केलेली 165 धावांची भागीदारी याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावांपर्यंत मजल मारली होती.  6 बाद 146 अशा संकटातून पंत-वॉशिंग्टन जोडीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने पंतची विकेट गमावून 7 बाद 294 धावा केल्या होत्या.  

वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी 7 बाद 294 धावांवरुन भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर खेळत असताना अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला आठवा धक्का बसला. अक्षर पटेल 43 धावांवर रन आउट झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला एकाच षटकात शून्यावर माघारी धाडत भारतीय संघाचा डाव 365 धावांत आटोपला. 

भारतीय संघाने घेतलेल्या आघाडीही इंग्लिश फलंदाजांना भेदता आली नाही. लॉरेन्स (50), कर्णधार ज्यो रुट (30), ओली पोप (15) आणि बेन फोक्स (13) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. परिणामी इंग्लंडचा दुसरा डाव 135 धावांत आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon: पावसाचा ११९ वर्षांचा विक्रम, पुणे शहरात जुलैमध्ये ५२६ मिलिमीटर पावसाची नोंद

Ichalkaranji Municipal Commissioner : इचलकरंजीत आयुक्तांच्या बदलीवरून संघर्ष; भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटात वाद पेटण्याची चिन्हे, CM फडणवीसांची मागितली वेळ

Commonwealth Games 2026: एका माजी गोलंदाजाने नीरज चोप्राला भालाफेकीत हरवले; CWG मध्ये गोल्ड जिंकणारा तो कोण?

Latest Marathi News Live Update : अमित शहा गो बॅक! काँग्रेसचं पुण्यात आंदोलन, तर भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या दारात

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

SCROLL FOR NEXT