INDvsENG Harmanpreet Kaur epic reply to commentator on Deepti Sharma's run out wins internet
INDvsENG Harmanpreet Kaur epic reply to commentator on Deepti Sharma's run out wins internet  esakal
क्रीडा

INDvsENG 'आम्ही चुकीचं केलं...'; 'त्या' विकेटच्या वादावर कॅप्टन कौरने सोडले मौन

सकाळ डिजिटल टीम

भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. मात्र, एका विकेटमुले या सामन्यात वाद उद्भवला. यासर्वावर टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने मौन सोडेल आहे. (INDvsENG Harmanpreet Kaur epic reply to commentator on Deepti Sharma's run out wins internet )

नेमका विषय काय?

इंग्लंडला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. शार्लोट डीन शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली शार्लोट डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत चेंडू फेकण्याऐवजी स्टंप उडवला.

भारतीय खेळाडूंनी धावबाद (मँकाडिंग) साठी अपील केले, त्यानंतर तिसऱ्या पंचाचा सहारा घेण्यात आला. रिप्लेने पुष्टी झाले की डीनने वेळेपूर्वीच क्रीज सोडली. तिसऱ्या पंचाने इंग्लिश फलंदाजाला धावबाद घोषित केले.

कॅप्टन कौरने सोडले मौन

सामन्यानंतर हरमनप्रीत कौरला या विकेट संदर्भात विचारण्यात आले. मात्र, ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. पण तिला त्या विकेटसंदर्भात पुन्हा प्रश्न विचारला असता. "आम्ही घेतलेल्या उर्वरित 9 विकेट्सबद्दल तुम्ही विचारलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येतं. आम्ही कोणतीही चूक केली नाही." अशा शब्दात कॅप्टन कौरने त्या विकेट वादावर सडेतोड उत्तर दिलं.

तसेच, हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही काही नवीन केलंय असं वाटत नाही. मी माझ्या खेळाडूला पाठिंबा देईन. तिंन नियमाबाहेर काहीही केलेल नाही. असेदेखील कॅप्टन कौरने स्पष्ट सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT