Sharyas Iyer 
क्रीडा

INDvsNZ : श्रेयस, राहुलने धो डाला; भारताचा धावांचा डोंगर

सुनंदन लेले

हॅमिल्टन : श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट कोहली, केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचे आव्हान ठेवले आहे. 

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या पूर्णपणे नव्या सलामीच्या जोडीसह भारतीय संघ आज (बुधवार) नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात उतरला. पृथ्वी आणि मयांक यांनी डावाची आक्रमक सुरवात केली. पण, मोठी खेळी करण्यात या दोघांनाही अपयश आले. पृथ्वी 20 धावांवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. तर, मयांकही फटकेबाजीच्या प्रयत्नात 32 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत संघाची धावसंख्या शंभरच्या पार नेली. विराट या सामन्यात मोठी खेळी करेल असे वाटत असताना सोधीच्या गोलंदाजीवर 51 धावांवर तो त्रिफळाबाद झाला.

यानंतर आलेल्या आणि फॉर्ममध्ये असलेल्या राहुलने श्रेयसच्या साथीने भारताच्या धावसंख्येत झटपट वाढ केली. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला तिनेश धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकाविले. राहुलने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडविले. श्रेयस 103 धावांवर बाद झाल्यानंतर केदारने राहुलला साथ देत आक्रमक फलंदाजी केली. राहुलने 64 चेंडूत 88 धावांची, तर केदारने 15 चेंडूत 26 धावा केल्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT