INDvsWI 2nd test preview
INDvsWI 2nd test preview  
क्रीडा

INDvsWI : संघाची नाही, आजपासून पंतचीच 'कसोटी'

सकाळवृत्तसेवा

जमैका : आजपासून सुरु होणारा वेस्ट इंडीजविरुदधचा दुसराही कसोटी सामना जिंकून भारतीय संघ निर्भेळ यशासाठी सज्ज झाला आहे, पण या सामना रिषभ पंतसाठी "कसोटी'चा ठरणार आहे. फलंदाजीत सातत्याने येणारे अपयश आणि संधीची वाट पाहत असलेले दुसरे यष्टीरक्षक पंतवरचे दडपण वाढवणारे आहे. 

पहिला सामना 318 धावांनी जिंकणारा भारतीय संघ सबिना पार्कवरवर होणाऱ्या सामन्यातही फेव्हरिट आहे. पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडीज फलंदाजीचा स्पष्ट केलेल्या उणिवा भारताची हुकूमत स्पष्ट करणाऱ्या आहेत. येथील हवामान चांगले आहे आणि खेळपट्टीही उत्तम वाटत आहे, त्यामुळे आपल्या संघाकडून आणखी एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांनी म्हटले आहे. 

  भारतीय संघ व्यवस्थापन साधारतः विजयी संघात बदल करत नाही त्यामुळे या दुसऱ्या सामन्यातही बदल होण्याची शक्‍यता कमी आहे मात्र रिषभ पंतवर सर्वांचे लक्ष असेल. धावा किती केल्या यापेक्षा ज्या प्रकारे विकेट बहाल करून तो बाद झाला आहे त्यावर प्रश्‍नचिन्ह उभे रहात आहे. सर्व प्रकारातील गेल्या सात सामन्यात 0, 4, नाबाद 65, 20, 0, 24 आणि 7 अशीच कामगिरी त्याला करता आलेली आहे. अनुभवी वृद्धिमन साहा ड्रेसिंग रूममध्ये बसून संधीची वाट पहात आहे. त्याचबरोबर इशान किशन, कोना भारत यासारखे यष्टीरक्षक फलंदाजही सज्ज झालेले आहेत ही पंतसाठी धोक्‍याची घंटा आहे. 

विकेट मिळत असतात तेव्हा कोणताही वेगवान गोलंदाज फॉर्मात आलेला असतो. एकाच डावात पाच विकेट मिळवणाऱ्या ईशांत आणि बुमरा यांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढलेला आहे. तसेच जेव्हा जेव्हा चेंडू हातात आला आहे तेव्हा तेव्हा महम्मद शमीनेही अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. 
-भरत अरुण, गोलंदाजीचे प्रशिक्षक 

पंतप्रमाणे सलामीवीर मयांक अगरवाल धावा कराव्या लागणार आहे. ऑस्ट्रेलियात शानदार पदार्पण केल्यानंतर विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भेडसावणारा मधल्या फळीचा प्रश्‍न अजिंक्‍य रहाणेने सोडवला आहे. त्याची अर्धशतकी आणि शतकी खेळी. कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांचे योगदान भारतीय फलंदाजीला बळ देणारी ठरली होती. त्यामुळे रोहित शर्माला पुन्हा एकदा राखीव खेळाडूत रहावे लागेल. 

पहिल्या कसोटीतील अनुभवानंतर वेस्ट इंडीज फलंदाजांनी भारतीय वेगवान माऱ्याचा कसा अभ्यास केला आहे त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. शिमरॉन हेटमायर आणि शाय होप या नवोदितांनी निराश केले आहे तर रॉस्टन चेस दुसऱ्या डावात अपयशी ठरला होता. शानोन गॅब्रियन आणि केमार रोच यांच्याकडून भारतीय फलंदाजांना सावध रहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT