IND-WI-Pollard 
क्रीडा

INDvsWI : पूरन-पोलार्डच्या फटकेबाजीमुळे विंडीजची 315 पर्यंत मजल!

सकाळ डिजिटल टीम

कटक : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात विंडीजच्या निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने डावाची सूत्रे हाती घेत विंडीजला 315 धावांची मोठी धावसंख्या उभारून दिली. विजयासाठी भारतापुढे 316 धावांचे आव्हान असणार आहे. 

दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय तोफखान्याने टिच्चून आणि प्रभावी मारा केल्याने विंडीजच्या सलामीवीरांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शाई होप आणि एविन लुईस यांनी 57 धावांची सलामी दिली.

जडेजाने लुईसला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर नवख्या सैनीने हेटमायर, चेस यांना टिपले. रोस्टनही स्वस्तात माघारी परतला. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने पूरन आणि पोलार्डने सावध फलंदाजी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. पूरनने 89 आणि पोलार्डने नाबाद 74 धावांची खेळी साकारली. 

भारतातर्फे नवदीप सैनीने दोन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT