indw vs ausw 2nd odi australia gave 259 runs target to team india deepti sharma 5 wicket cricket news in marathi 
क्रीडा

INDW vs AUSW : एकट्या दीप्तीने अर्ध्या कांगारू संघाची केली शिकार! टीम इंडियाला मिळाले 259 धावांचे लक्ष्य

Kiran Mahanavar

India vs Australia मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 विकेट गमावत 258 धावा केल्या.

यावेळी, भारताच्या दीप्ती शर्माने कहर केला. तिने ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या संघाची शिकार केली. ऑस्ट्रेलियासाठी फोबी लिचफिल्डने 63 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 6 चौकारांचा समावेश होता. याशिवाय एलिस पेरीने 5 चौकार आणि 1 षटकार लगावत 50 धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे उर्वरित फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का कर्णधार एलिसाच्या रूपाने बसला. 24 चेंडूत 13 धावा केल्यानंतर तिला पूजा वस्त्राकरने बोल्ड केले. तर एलिस पेरीला दीप्ती शर्माने श्रेयंका पाटीलच्या हाती झेलबाद केले. पेरी 47 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाली.

बेथ मुनीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. 17 चेंडूत 10 धावा करून ती बाद झाली. मुनीला दीप्तीने एलबीडब्ल्यू केले. फोबी लिचफिल्ड 98 चेंडूत 63 धावा करून बाद झाली. श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर तिला रिचा घोषने झेलबाद केले.

कांगारू संघाला पाचवा धक्का अॅश्ले गार्डनरच्या रूपाने बसला. तिने सहा चेंडूंवर दोन धावा केल्या. ताहिला मॅकग्रा 32 चेंडूत 24 धावा करून दीप्ती शर्माची शिकार ठरली. त्याचवेळी अॅनाबेल सदरलँड (23) दीप्तीने तिच्याच चेंडूवर झेलबाद केले. अलाना किंग 28 आणि किम गर्थ 11 धावांवर नाबाद राहिले.

भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 5 बळी घेतले. यादरम्यान तिने 10 षटकात 3.80 च्या इकॉनॉमीसह 38 धावा खर्च केल्या. याशिवाय पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील आणि स्नेहा राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT