Australia Vs West Indies esakal
क्रीडा

AUS vs WI : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला गाबा पुन्हा एकदा पडला; यावेळी विंडीजने लावला सुरूंग

Australia Vs West Indies : वेस्ट इंडीजने तब्बल 27 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात जिंकली कसोटी

अनिरुद्ध संकपाळ

Australia Vs West Indies Shamar Joseph : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या गाबामध्ये कांगारूंनी पुन्हा एकदा पराभव पहावा लागला आहे. भारताने गाबा जिंकल्यानंतर आता वेस्ट इंडीजने देखील ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडलं. वेस्ट इंडीजने रोमहर्षक सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. गाबा कसोटी जिंकत वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियासोबतची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली.

वेस्ट इंडीजकडून वेगवान गोलंदाज शामर जोसेफने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे 24 वर्षाचा हा गोलंदाज आपली दुसरीच कसोटी खेळत होता. जोसेफला सामनावीर आणि मालिाकवीराचा देखील पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात त्याचा पायाचा अंगठा दुखावला होता. फलंदाजी करताना त्याला मैदान देखील सोडावे लागले होते. मात्र तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला अन् त्यानं विंडीजच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला. (West Indies Defeat Australia In Gabba Won Test After 27 Years)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दिवस रात्र कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने 311 धावा केल्या होत्या. यात जोशुआ दे सिल्वाने सर्वाधिक 79 तर कावम हॉजने 71 धावा केल्या.

त्यानंतर वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 289 धावात संपवला होता. विंडीजने पहिल्या डावात 20 धावांची निसटती आघाडी घेतली. यावेळी विंडीजकडून अल्झारी जोसेफने 4 तर रोचने 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरीने 65 तर कर्णधार पॅट कमिन्सने 64 धावांची खेळी करत डाव सावरला होता.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडीज 193 धावाच करता आल्या होत्या. हेजलवूड आणि लॉयनने 3 विकेट्स घेत चांगला मारा केला. तर वेस्ट इंडीजकडून किर्क मॅकेन्झीने सर्वाधिक 41 धावा केल्या.

विजयासाठी 213 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 207 धावात आटोपला. वेस्ट इंडीजकडून शामर जोसेफने दुखापत झाली असताना भेदक मारा करत 7 विकेट्स घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने एकाकी झुंज देज नाबाद 91 धावा केल्या तर कॅमरून ग्रीनने 42 धावांची खेळी करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला.

मात्र विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज असताना शामर जोसेफने हजलवूडला शुन्यावर बाद करत वेस्ट इंडीजच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT