Fifa World Cup2022 sakal
क्रीडा

Fifa World Cup2022 : वर्ल्डकपचा धमाका पण चर्चा कतारच्या नियमांची, काय आहे ड्रेस कोड अन् हाय्या कार्ड ?

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकानंतर होणारी दुसरी सर्वांत मोठी बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे

शैलेश नागवेकर

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकानंतर होणारी दुसरी सर्वांत मोठी बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. कोरोनाचे संकट अद्याप पूर्ण टळलेले नसले तरी कतारमध्ये होणारी ही विश्वकरंडक स्पर्धा निर्बंधमुक्त आहे, तरीही सामाजिक आणि पारंपरिक नियमांची चौकट स्पर्धेच्या निमित्ताने कतारमध्ये येणाऱ्या सर्वांना असणार आहे. कपड्यांपासून ते मद्यापर्यंत हे नियम आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कतार देशाने कंबर कसली आहे. जवळपास जगभरातून १.५ कोटी प्रेक्षक येण्याचा अंदाज आहे. त्यांची गैरसोय होऊ न देता कोरोनाबाबत काळजी घेत तरीही नियमांच्या सीमा आखण्याचा हा खटाटोप ...

कतारला येण्यापूर्वी कोरोना चाचणीची गरज नाही. तसेच येथे आल्यावरही कोरोना चाचणी आवश्यक नाही, परंतु कतारमध्ये आल्यावर कोरोनाचे संक्रमण झाल्यास विगलीकरणाचे नियम पाळावे लागतील.कतारमध्ये फिरताना मास्कची गरज नाही, पंरतु रुग्णालय किंवा हेल्थ सेंटरमध्ये गेल्यावर मास्क अनिवार्य.कतारच्या वैद्यकीय मंत्रालयाने एतेराझ या नावाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अॅप तयार केले आहे. कतारमध्ये आल्यावर कोणतेही सीमकार्ड असले तरी हे अॅप मोबाईलमध्ये घेणे करणे अत्यावश्यक.

हाय्या कार्ड

स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटक, संघाचे पाठीराखे या सर्वांना ओळखपत्रासाठी हाय्या कार्ड घेणे अनिवार्य. फॅन झोनपर्यंत स्थानिक वाहतूक वापरायची असल्यास हाय्या कार्डनेच प्रवेश दिला जाणार.

आरोग्य विमा

सरकारी रुग्णालयात मोफत उपचारासाठी पर्यटकांनी ‘पर्यटन तत्काळ आरोग्य विमा’ यासाठी नोंदणी करावी, परंतु हाय्या कार्ड असणे गरजेचे.

ड्रेसकोड

कतार हे मुस्लीम राष्ट्र असल्यामुळे मुळात येथे कपडे वापरण्यासाठी काही कडक नियम आहेत. स्थानिक संस्कृतीचा आदर ठेवण्यासाठी, सार्वजनिक जागा, मॉल अशा ठिकाणी परदेशी व्यक्तींनी व्यवस्थित कपडे परिधान करण्याच्या अटी. खांदा पर्यंत बाह्या असाव्यात. गुडघ्याच्या पुढे पँट असाव्यात. केवळ जलतरण तलावाताच ‘स्वीमिंग कॉश्च्युम’ वापरण्यास परवानगी.

टी-शर्ट काढण्यावर निर्बंध

स्टेडिअममध्ये ‘टी-शर्ट’ काढण्यास बंदी असणार आहे. या नियमाचा फटका खेळाडूंना बसू शकेल. कारण गोल केल्यावर किंवा सामना संपल्यावर ‘टी-शर्ट’ काढणे हे फुटबॉलमध्ये सररास होत असते. या स्पर्धेत खेळाडूंना मात्र सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

मद्यबंदी

कतारमध्ये येताना मद्य आणण्यास मुळातच बंदी आहे, परंतु मद्य प्राशनाचा ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांना रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्येच मद्य प्राशन करण्याची परवानगी.

ड्रग आणि सिगारेट

उत्तेजक द्रव्य किंवा पदार्थांचे सेवन हा कतारमध्ये गुन्हा आहे. त्यामुळे अशी कृती कोणाकडूनही स्पर्धे दरम्यानही खपवून घेतली जाणार नाही. कैद तसेच मोठा आर्थिक दंड अशी शिक्षेला सामोरे जाऊ लागेल. इलेक्टिक सिगारेटलाही बंदी करण्यात आली आहे.

छायाचित्रण

उत्साहाच्या भरात नजरेस पडेल त्याचे छायाचित्रण करण्याची हौस कतारमध्ये महागात पडू शकेल. सरकारी बिल्डिंग, सैन्याचा कॅम्पस, औद्योगिक क्षेत्र यांचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केल्यास मोठी शिक्षा होऊ शकते.

औषधे

स्वतःच्या मर्जीनुसार कोणालाही कोणतीही औषध मिळणार नाही. डॉक्टरांनी सूचना केलेली औषधच देण्यात येतील.

एकूण काय तर विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा उत्साह घेत असताना स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला नियमांचे पालन करावे लागणार. हुल्लडबाज प्रेक्षकांना या नियमांमुळे चाप बसू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT